Home / चंद्रपूर - जिल्हा / जिल्हाधिकारी कार्यालयात...

चंद्रपूर - जिल्हा

जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या कामासाठी आता दूरध्वनी क्रमांक उपलब्ध

जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या कामासाठी आता दूरध्वनी क्रमांक उपलब्ध

अभ्यागतांनी 8329651110 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 11 जानेवारी : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमितपणे मास्क लावणे, आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर न पडणे, एकाच ठिकाणी गर्दी न करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे आदी नियमांचे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे.

त्यामुळे शासकीय कामाने जिल्हाधिकारी कार्यालयात येणा-या नागरिकांची कामे सोडविण्यासाठी किंवा त्यांची अडचण जाणून घेण्यासाठी आता प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची गरज नाही. जिल्हा प्रशासनाने दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला असून अभ्यागतांनी तातडीच्या कामासाठी 8329651110 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.     

महसूल व वनविभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाच्या आदेशान्वये, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दि. 10 जानेवारी 2022 पासून निर्बंध लावण्यात आले आहे. त्यानुसार 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत कुठल्याही महत्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना भेटण्यास बंदी घातलेली आहे. तरी, ज्या अभ्यागतांना अत्यंत तातडीच्या कामासाठी संपर्क करावयाचा असेल त्यांनी दर सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी दुपारी 12 ते 2 या वेळेत  8329651110 या दूरध्वनी क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज तसेच व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी यांना भेटण्यास येणाऱ्या अभ्यांगतांनी सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...