रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
विनोद बोरेंशी केली चर्चा, - ‘पढेगा भारत- तो आगे बढेगा भारत’ चळवळ गावागावात पोहचविण्याचे दिले आश्वासन, कोरोना काळात प्रकाशित केलेले पुस्तक प्रेरणादायी असल्याचे व्यक्त केले मत
भारतीय वार्ता (मेहकर) : मेहकर तालुक्याचे तहसीलदार संजय गरकल हे आज (ता.18) साहित्यिक तथा स्वप्नपूर्ती मिडियाचे संपादक विनोद बोरे यांच्याशी पुस्तक चळवळीबाबत चर्चा करण्यासाठी चिंचोली बोरे गावात आले. यावेळी त्यांनी बोरे यांच्या जिजाऊ निवासस्थानातील स्वप्नपूर्ती मिडिया कार्यालयाला भेट दिली. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन तहसीलदार गरकल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा पुस्तकं देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ते म्हणाले, युवकांच्या कल्याणासाठी कोरोना काळात निर्माण केलेले पडद्यामागचे नायक हे पुस्तक खरोखरच प्रेरणादायी आहे. आपल्या भागात सकारात्मक विचारांची चळवळ असणे गरजेचे होते. युवक उद्योग-व्यवसाय-अभ्यास किंवा मेहनतीकडे वळण्यासाठी प्रचंड ताकदीचे विचार अन् तेही उदाहरणांसह पुस्तकरुपात समाजासमोर मांडणे गरजेचे होते. हे काम बोरे यांच्याकडून झाले. यासाठी निश्चितच त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. त्यामुळेच एक दर्जेदार साहित्यकृती निर्माण झाली. ही साहित्यकृती प्रत्येकाने वाचायलाच हवी. जेणेकरुन मनातील नकारात्मक विचार संपून उज्वल कार्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास युवा मन ताकदीने धजावेल. यासाठी पढेगा भारत तो आगे बढेगा भारत ही वाचन चळवळ गावागावात पोहोचविण्यासाठी बोरे यांच्यासोबत समर्थपणे उभा आहे. ही चळवळ केवळ बोरेंची राहिली नाही, तर आम्ही सर्व अधिकारी सोबत आहोत. पडद्यामागचे नायक हे पुस्तक युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी स्वत: योग्य नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करणार आहे, असेही तहसीलदार गरकल म्हणाले.
यावेळी तहसीलदार गरकल यांनी साहित्यिक बोरे यांचे वडील नारायणराव बोरे, आई गोदावरीआई बोरे यांच्याशी संवाद साधला. सरपंचपती अनंथा बोरे, शेतकरी सुभाषराव बोरे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.
‘पत्नीला स्वातंत्र्य दिल्यास तीची योग्य साथ लाभतेच’
विनोद बोरे यांना त्यांच्या पूर्णांगिणी अर्चनाताई बोरे यांची साथ लाभत असल्यामुळेच त्यांच्याकडून माझी आई, माझा बाप आणि आता पडद्यामागचे नायक या दर्जेदार पुस्तकांची निर्मिती झाली. अर्चनाताई ह्या विनोद बोरेंच्या पुस्तक चळवळीतील मुख्य पडद्यामागच्या नायिका आहेत. त्यांचा त्याग, मार्गदर्शन ह्या गोष्टी नजरेआड करता येण्यासारख्या नाहीच. कोणत्याही पतीने पत्नीला स्वातंत्र्य दिल्यास तीची योग्य साथ लाभतेच, असेही तहसीलदार गरकल म्हणाले. सकारात्मक विचाराने कार्य करणारे, महापुरुषांना आदर्श मानून त्यांच्या पाऊलवाटेवर चालणाऱ्या बोरे दाम्पत्याकडून भावी काळातही उत्कृष्ट कार्य घडत राहील, अशी अपेक्षादेखिल त्यांनी व्यक्त केली.
‘बोरे कुटूंबियांशी साधलेला संवाद हे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण’
बोरे कुटूंबियांशी साधलेला संवाद हा आयुष्यात अविस्मरणीय क्षण म्हणून आठवणीत राहणार आहे. शेतकरी कुटूंबियांचा जिव्हाळा कायम काळजात राहील, असेही गरकल म्हणाले.
प्रमोद बोरे, गणेश बोरे, पवन सातपुते यांचीदेखिल यावेळी उपस्थिती होती.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...