Home / यवतमाळ-जिल्हा / पुसद / पत्रकारांवर भ्याड हल्ल्या...

यवतमाळ-जिल्हा    |    पुसद

पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा ; समस्त पत्रकारांची मागणी

पत्रकारांवर भ्याड हल्ल्या करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा ; समस्त पत्रकारांची मागणी
ads images
ads images
ads images

हल्ल्यासंदर्भात पत्रकारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सोपविले निवेदन.

पुसद (प्रतिनिधी): यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका अंतर्गत काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पुसद येथील दोन पत्रकार बंधूंवर वार्तांकन करीत असताना जमावाने भ्याड हल्ला चढविला व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या जवळील साहित्य बळजबरीने लुटले. या घटनेचा जाहीर निषेध करत हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पुसद पत्रकारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद यांना देण्यात आले.

Advertisement

पत्रकार हा समाजाचा आरसा असतो प्रत्येक घटनेचे वार्तांकन निर्भीड व निष्पक्षपणे तो समाज व शासन तसेच प्रशासनासमोर मांडत असतो अशातच अतिसंवेदनशील भागात जाऊन सुद्धा जीव मुठीत घेऊन पत्रकारिता करतो मात्र सद्या पत्रकार असुरक्षित असल्याची भावना पुन्हा निर्माण झाली. मागील घटने प्रमाणे पुन्हा शुक्रवारी काळी दौलत खान येथे झालेल्या पत्रकारांवरील भ्याड हल्ल्यामुळे पत्रकारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

पुसद येथील जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदेश कान्हु आणि मुकाबला न्यूज-24 चे प्रतिनिधी अँकर सैय्यद फैजान यांच्यावर काळी दौलत खान येथे हल्लेखोरांनी शुक्रवार दिनांक 03 डिसेंबर रोजी रात्री अंदाजे आठ वाजता च्या सुमारास 30 ते 40 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढविला तसेच पत्रकारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात हल्लेखोरांनी पत्रकारांजवळील संपूर्ण साहित्य रोख रकमेसह अंदाजे 80 हजार पर्यंतच्या मुद्देमाल बळजबरीने लुटले. सदर घटना ही जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. श्री दिलीप भुजबळ पाटील, मा उपविभागीय अधिकारी श्री सावन कुमार, तसेच पोलीस प्रशासनातील अनेक कर्मचारी वरिष्ठ अधिकारी यांच्या सह पुसद येथील आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांच्या समोर घडली हे विशेष. लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनासमोर जर चौथ्या आधार स्तंभावर हल्ला झाला आहे ही अतिशय निंदनीय बाब आहे. अशा घटना वारंवार घडू नये. या घटनेतील हल्लेखोरांवर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत व भारतीय दंड संहिता अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पुसद तालुक्यातील समस्त प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियाच्या पत्रकारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच इतर इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.

सदर निवेदनावर जेष्ठ पत्रकार ललित सेता, दीपक हरीमकर, हरिप्रसाद विश्वकर्मा, यू.एन. वानखेडे, ॲड. अनिल ठाकूर, मारोती भस्मे, दीपक महाडिक, सैय्यद मुजीबोद्दिन, प्रदीप नरवाडे, अमोल व्हडगिरे, रुपेंद्र अग्रवाल, बळवंत मनवर, मनोहर बोंबले, बाबाराव उबाळे, शंकर माहुरे, गणेश राठोड, संजय कुमार हनवते, राजेश ढोले, रामदास कांबळे, रवि मोगरे, बाबूलाल राठोड, प्रकाश खंडागळे, मनीष दशरथकर, दिनेश खांडेकर,राजू सोनूने, अनिल चव्हाण, अहमद पठाण, शेख शब्बीर, हाफिझ रब्बानी, मुबाशिर शेख, बाबा खान, पवन चव्हाण, उमेश जाजू, विजय निखाते, अमोल ठाकूर, शेख अक्रम, वर्षा कांबळे, मजीद खान, सुहास पवार, प्रकाश खिल्लारे, समाधान केवठे, सैय्यद फैज़ानोद्दिन, संदेश कान्हु, संतोष मस्के, संजय रेक्कावर आदी पत्रकारांचे सह्या आहेत.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पुसद तील बातम्या

नवरात्र उत्सवानिमित्त महिलांचा खासदार भावना गवळी यांच्या हस्ते साडी देऊन केला सन्मान

यवतमाळ: नवरात्र उत्सवानिमित्त मान मातेचा खेळ रंगला साडीचा त्यात 80 महिला विजेत्या ठरल्या. स्पर्धेतील विजेत्या माता...

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान*

*तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय मदन आडे यांना महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान* ✍️गजानन...

*विचाराचं ,ज्ञानाचं खंर सोनं लुटण्याचं एकमेव प्रेरणास्थळ- दीक्षाभूमी. !*

भारतीय वार्ता :पाच कोटी रूपयाची पुस्तक विक्री. *✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद-9421774372 काल दसरा आणि धम्मचक्र...