वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
त्रीसदस्यीय समितीद्वारे जिल्हाधिकारी यांचे योग्य चौकशी चे आदेश
क्रिष्णा वैद्य (ब्रम्हपुरी) : नगरपरिषद ब्रम्हपुरीमध्ये शहर विकास योजना आराखडा कंत्राटाच्या वादाने सुरू झालेला पालिकेतील कलगीतुरा सध्यातरी शमण्याचे कुठलेही सूतोवाच पालिकेत दिसून येत नसून नियोजन सभापती एड श्री दीपक शुक्ला यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगर परिषद मुख्याधिकारी श्री मंगेश वासेकर व इतरांविरुद्ध फौजदारी गुन्ह्याची नोंद करावी अशी मागणी केली आहे.तर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत त्रीसदस्यीय समिती मार्फत सात दिवसात योग्य चौकशी पूर्ण करण्याचे आदेश धडकल्याने पालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ज्या नगर परिषदेच्या विकास योजनेला अमलात येऊन 17 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा पालिकेस नगर परिषदेच्या ठरावाद्वारे सुधारित विकास आराखडा तयार करणेकामी सहाय्य करण्यासाठी खाजगी संस्थेची किंबहुना एजन्सीची नियुक्ती करणे आवश्यक असते मात्र अशी खाजगी संस्था ही शासनाच्या यादीतील असणे आवश्यक आहे अशी तरतूद महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे दि.25/01/2019 च्या शासन निर्णयात स्पष्ट नमूद आहे व सदर च्या शासन निर्णयाच्या प्रत राज्यातील नगरपालिका चे सर्व मुख्याधिकार्यांना प्राप्त करून देण्यात आलेले आहेत. याशिवाय संचालक नगर रचना पुणे महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे दिनांक 29/12/2020 च्या आदेशान्वये नागपूर विभागाकरिता नगर रचनाकार अधिकाऱ्यांना सहाय्य करण्याकरिता शासनाची अधिकृत एजन्सी/खाजगी संस्था शासकीय आदेशां द्वारे घोषित केली असताना बहुबळी चे मुख्य अधिकारी तसेच रचना सहाय्यक हेमंत घोलप तसेच तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी व विद्यमान मुख्याधिकारी बल्लारपूर नगरपरिषद विजय सरनाईक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ चंद्रपूर येथील अधीक्षक अभियंता यांनी आपसात संगणमत करून राज्य शासन विरुद्ध कटकारस्थान करून शासन आदेशान्वये अनुज्ञेय नसलेला महाराष्ट्र महानगरोत्थान अभियान सुवर्ण जयंती (जिल्हास्तर) हा मुलभूत सुविधा व मूलभूत कामांकरिताचा अनुज्ञेय निधी बेकायदा पद्धतीने खोटे प्रमाणपत्र देऊन मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी जिल्हा नियोजन विभागाकडून प्राप्त करून घेतला होता. नगर पालिकेतून देखील सुमारे 38 लक्ष रुपयाची तरतूद बेकायदा पणे मुख्याधिकारी यांनी करून घेतली होती.
अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ चंद्रपूर यांना या कामाचे अंदाजपत्रकास तांत्रीक मान्यता देण्याचा अधिकारच नसताना त्यांनी बेकायदा कामास मुख्याधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी 1,88,9596/- रु. एवढ्या किमतीचे बेकायदा अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता दिली व अशाप्रकारे नगरपालिका,करदाते व शासनाची सुमारे दोन कोटी रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्याचा परिपूर्ण प्रयत्न मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी केला. तसेच बेकायदा कंत्राट कामी अंदाज पत्रक तयार करण्याच्या विविध प्रक्रिया कामावर तीन लक्ष रुपये नगरपरिषद चा नुकसान करण्यात आला.
या संबंधाने मुख्याधिकारी नगरपरिषद ब्रह्मपुरी व इतर यांचे विरुद्ध फौजदारी गुन्ह्याची नोंद होण्याकरिता कायदेशीर फिर्याद दिनांक21/06/2021 रोजी देऊन देखील अद्यापर्यंत ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
केवळ भ्रष्ट मार्गाने पैसे कमाविण्याकरिता ब्रह्मपुरी चे मुख्याधिकारी श्री मंगेश आनंदराव वासेकर यांनी शासन आदेश व नियमांच्या विपरीत हेतूपुरस्पर वागून चक्क महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांकडे व राज्याच्या उच्चाधिकार समितीकडे व प्रधान सचिव प्रकल्प अंमलबजावणी समितीकडील अधिकार वापरण्याचा फौजदारी शिक्षेस पात्र असा कृत्य केल्यावर देखील अद्याप पर्यंत मुख्याधिकारी व इतर अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्ह्याची नोंद ब्रह्मपुरी च्या पोलिसांनी केलेली नाही. या प्रमाणात 15 जुलै पावेतो मुख्याधिकारी व इतर यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद न झाल्यास नियोजन सभापती यांनी नगरपरिषद सामोर आमरण उपोषण व सत्ताधारी असलेल्या काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व तसेच पदाचा राजीनामा देखील देण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये एडवोकेट श्री दीपक शुक्ला यांनी दिला आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...