भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (वणी प्रतिनिधी): जि. चंद्रपूर ता पोंभुर्णा अंतर्गत बोर्डा (दिक्षित) येथील सामाजिक सभागृहाचे स्व. मा. सा. कन्नमवार यांचे नाव देऊन पुसून सामाजिक तेढ निर्माण करून सभागृहावरील कन्नमवार यांचे नाव पुसण्यास बेकायदेशीर सहकार्य करणारे पोंभुर्णाच्या ठाणेदार यांच्यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती तर्फे आज उपविभाग अधीकारी वणी यानादेण्यात आले. यावेळी निवेदनातून समोरील प्रमाणे मागणी केली गेली.
मौजा बोर्डा( दिक्षित) तालुका -पोंभुर्णा -जि. चंद्रपूर येथे एका सभागृहाचे बांधकाम करून संबंधित ग्रामपंचायतने दिनांक २५/११/२०१९ चे मासिक सभेत ठराव क्रमांक १०/१ नुसार सदर सभागृहाला स्व. मा. सा. कन्नमवार हे नाव देण्याचे सर्वानुमते ठराव मंजूर केला व त्यांनुसार १० जानेवारी २०२० रोजी कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्या १२० व्या जयंती दिनी सदर नाव सभागृहाला देण्यात आले असता सदर नावास विरोधकानी विरोध करून नाव पुसण्यास विरोधक आले.ह्या झालेल्या प्रकारामुळे समाजाच्या अस्मितेला धक्का बसला आहे.तसेच गावात तेळ निर्माण करणारी ही घटना घडवून आणणारे तेथील पोलिसस्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, ज्यांनी समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्रचा अपमान केला आहे. एका माझी मुख्यमंत्रीचे नाव पुसण्यास सांगणे आणि ते करून घेणे शांत गावात अशांतता निर्माण करणे या कायद्यात तेथील पोलीस निरीक्षक यांना त्वरित निलंबित करावे.अशी मागणी निवेदन देऊन
कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवातच आदिवासी आंदोलना पासून केली , त्याच्या हक्कासाठी ते लढले हे सर्व आदिवासी बांधवांना माहिती आहे म्हणून या गावात ही आदिवासी मंडळी व भटक्या विमुक्त जमाती ची मंडळी गुण्यागोविंदाने वावरत आहे मात्र या गावात द्वेष निर्माण करण्याचे कार्य करण्यात आले पंचायत राज्य कायदाचे उल्लंघन करीत कोणतीही सूचना गावकऱ्यांना न देतां विपरीत ठराव पोलीस अधिकारी यांच्या सांगण्यावरून पुन्हा ठराव २६ जानेवारी २०२१ ला घेण्यात आला. जे घटनेनुसार अमान्य आहे. तसेच वेळेवर घेतलेली सभा मुंबई ग्रा. पं. अधिनियमाला धरून नाही. संबंधित सभागृहाला स्व. मा. सा. कन्नमवार हे नाव पूर्ववत जैसे थे लिहिण्यात यावे.व कर्तृत्व माझी मुख्यमंत्री याच्या कार्याचा उजाळा पुन्हा निर्माण होवावा यासाठी हे निवेदन त्यांच्या कार्या प्रति बहुजन नायक, विदर्भ पुत्र, स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्या नावाचे विद्रूपीकरण ज्यांनी केले त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. राज्य सरकारने व जिल्हा प्रशासनाने या संदर्भात तत्काळ कारवाई न केल्यास कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती तर्फे राज्यभरातून भटके विमुक्त, ओबीसी बांधव, बेलदार समाज रस्त्यावर उतरून, आंदोलन करेल. असा इशारा कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समितीचे गजानन चंदावार यांनी दिला. यावेळी नगरसेवक, राकेश बुग्गेवार, ज्ञानेश्वर बोनगिरवार, विनोद महाजनवार, अमोल मसेवार, संदीप मुत्यलवार, नंदकिशोर जुब्बेवार, आशिष मसेवार, राकेश बरशेट्टीवार, अक्षय मसेवार आदी उपस्थित होते.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...