Home / चंद्रपूर - जिल्हा / कृत्रिम टंचाई निर्माण...

चंद्रपूर - जिल्हा

कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर दि. 18 सप्टेंबर : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात युरिया खताची उपलब्धता आहे. मात्र खताच्या उपलब्धतेत अडचण निर्माण करत कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना वाढीव दराने खताची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहे. अशा कृषी केंद्राची तपासणी करून दोषी आढळणाऱ्या रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कृषी विभागाला दिले. ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित युरिया खताबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार अभिजीत वंजारी, जिल्ह्याधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्र शासनाच्या धोरणानुसार रासायनिक खताचे वितरण एम-एफएमएस प्रणालीवर ई- पाॅस मशीनवर करणे बंधनकारक असतांना जिल्ह्यातील काही परवानाधारक रासायनिक खत विक्रेते ऑफलाइन स्वरूपात विक्री करत असल्यामुळे जिल्ह्याच्या पोर्टलवर युरिया खत शिल्लक दिसते. यामुळे खताच्या उपलब्धतेमध्ये अडचण होऊन युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत आहे.

वाढीव दराने खताची विक्री तसेच अनावश्यक खत उत्पादनांची जबरदस्तीने शेतकऱ्यांना विक्री करणाऱ्या संबंधित परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्रधारकावर कायद्याप्रमाणे निलंबनाची कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील दोन दिवसात कृषी केंद्राची तपासणी करून तसा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा व दोषी आढळणाऱ्या परवानाधारक रासायनिक खत विक्री केंद्र धारकांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

जिल्ह्यात नियमितपणे युरिया व इतर खतांची उपलब्धता व पुरवठा होत राहील, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यात मुबलक प्रमाणात युरियाचा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी काळजी करू नये. खरीप हंगाम 2021 करिता 50,690 मेट्रिक टन युरिया कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून आवटंन मंजूर असून दि. 1 एप्रिल ते 17 सप्टेंबर 2021 पर्यंत जिल्ह्यात 48,120 मेट्रिक टन म्हणजेच 94.92 टक्के युरियाची उपलब्धता झाली आहे व आज रोजी जिल्ह्यात 7925 मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे.

खरीप हंगाम 2021 (30 सप्टें. 2021)अखेर युरिया खताची 6083 मेट्रिक टन उपलब्धता नियोजित आहे. दि. 1 ऑक्टोबर 2021 पासून रब्बी हंगामास सुरुवात होत असून चंद्रपूर जिल्हाकरिता 22,240 मेट्रिक टन युरिया खताचे आवंटन कृषी आयुक्तालयाने मंजूर केले आहे. त्यानुसार युरिया खताची जिल्ह्यात नियमित उपलब्धता असणार आहे.

सद्यस्थितीत खरीप हंगाम सुरू असून भात, कापूस, सोयाबीन ही मुख्य पिके आहेत. जिल्ह्यात 4,46,100 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून आतापर्यंत 4,55,521 म्हणजेच 94.93 टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली असून विविध ग्रेडच्या रासायनिक खतांची पिकांना मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...