आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
भाजपा जनसंपर्क कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
चंद्रपूर: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची व विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. अंदमानच्या अंधार कोठडीत असताना स्वातंत्र्याच्या विचारांचा सुर्य त्यांनी कायम तळपत ठेवला. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला . त्यांच्या देशभक्तीपर विचारांचा अंगीकार करणे हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३८ व्या जयंतीनिमीत्त आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर भारतदेशासाठी कायमच विचारांचे ऊर्जापीठ राहणार आहे. दारिद्रय निर्मुलन व विषमता नष्ट करण्यासाठी त्यांच्या विचारांची आपल्याला सदैव गरज आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी प्रामुख्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा नेते राजेंद्र गांधी, चंद्रपूरच्या महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, भाजयुमो अध्यक्ष विशाल निंबाळकर, प्रकाश धारणे, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार, अॅड. सुरेश तालवेार, राजकुमार आकापेल्लीवार यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम भाजपा जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...