Home / यवतमाळ-जिल्हा / झरी-जामणी / मुकुटबनच्या वादग्रस्त...

यवतमाळ-जिल्हा    |    झरी-जामणी

मुकुटबनच्या वादग्रस्त ठाणेदारासह दोन कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन..!

मुकुटबनच्या वादग्रस्त ठाणेदारासह दोन कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन..!
ads images

ट्रॅक्टर मालकाकडून 50 हजाराची लाच घेणे आले अंगलट, पोलीस वर्तुळात दहशतीचे वातावरण.

आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने, सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर तत्कालीन रायटर सुलभ उईके यांना जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. एका ट्रॅक्टर मालकाकडून मध्यस्थाद्वारे 50 हजारांची लाच घेऊन वरून खोटा गुन्हा ही दाखल केला असा आरोप तक्रारकर्ते दीपक उदकवार यांनी करत याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. याबाबत पैसे घेतल्याची एक कथित ऑडिओ क्लिप परिसरात व्हायरल झाली होती. एकतर पैसेही घेतले आणि वरून गुन्हाही दाखल केला याबाबत तालुक्यात चांगलीच खमंग चर्चा रंगली होती. या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत होता. दरम्यान मुकुटबन पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा प्रभार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी घेतला आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुकुटबन येथील रहिवासी असलेले दीपक उदकवार हे हॉटेल व्यावसायिक आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना रेतीची आवश्यकता होती. पाऊस सुरू असल्याने रेती मिळत नसल्याने त्यांनी ड्रायवरला रेती आणायला सांगितली. दरम्यान एक महिन्याआधी येडशी गावाजवळ ठाणेदार धर्मा सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर यांनी पहाटे 6 वाजताच्या दरम्यान त्यांचा ट्रॅक्टर पकडला. कोणताही पंचनामा न करता ट्रॅक्टर जप्त करून पोलीस स्टेशनला लावला.

पोलिसांनी ट्रॅक्टर मालक दीपक उदकवार यांना घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजता ठाण्यात बोलाविले. उदकवार ठाण्यात गेले असता ठाणेदार सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर हजर होते. दोघांनीही दीपक याला 1 लाखांची लाच मागितल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप होता. तसेच पैसे न दिल्यास रेती चोरीचा गुन्हा दाखल करतो व महसूल विभागाकडे ट्रॅक्टर सोपवून दीड लाखाचे दंड ठोठवायला लावतो असे देखील धमकावले.

ठाणेदार सोनुने यांचे तत्कालीन रायटर सुलभ उईके यांनी मोबाईलद्वारे दीपक यांना फोन करून 1 लाखांवरून 50 हजारांच्या बदल्यात कोणताही गुन्हा दाखल न करण्याची सेटलमेंट केली. त्यानुसार 50 हजार रुपये देण्याचे कबूल झाले. ठाणेदार सोनुने व ऋषी ठाकूर यांनी 50 हजार आणण्याकरिता होमगार्ड निखिल मोहितकर यांना दीपक यांच्या हॉटेल मध्ये पाठविले.

होमगार्ड मोहितकर हे हॉटेल मध्ये गेले. त्यांनी दीपक यांच्या पत्नी जवळून 50 हजार रुपये घेतले व ठाणेदार सोनुने यांना दिले असा दीपक उदकवार यांचा आरोप आहे. मात्र 50 हजार देऊन देखील ठाणेदार व सहाय्यक फौजदार यांनी दीपक उदकवार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. दरम्यान आकसेपोटी चालकांवर गुन्हा दाखल न करता उदकवार यांच्यावर गुन्हा दाखल केला असा देखील तक्रारकर्त्यांचा आरोप होता.

ऑडिओ क्लिपमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन
या संपूर्ण प्रकरणात पैशाच्या देवाणघेवाण बाबत एक कथित ऑडिओ क्लिप परिसरात व्हायरल झाली. यात तक्रारदार एकाशी बोलत असून तो होमगार्ड असल्याचा दावा केला जात आहे. यात तक्रारदार हे पैसे पोहोचले का या बाबत विचारणा करीत असून दुसरी व्यक्ती साहेबांना पैसे दिल्याचे सांगत आहे. तसेच तक्रारदार पैसे घेतल्यावरही गुन्हा का दाखल केला अशी देखील विचारणा करीत आहे. ही कथित क्लिप व्हायरल झाल्याने पोलीस विभागाच्या अब्रुचे धिंडवडे निघाले होते.

तक्रारदारांनी यवतमाळ येथे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्यानंतर याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. अखेर या प्रकरणी कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेऊन ठाणेदार धर्मा सोनुने, सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर तत्कालीन रायटर सुलभ उईके यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

अजित जाधव यांच्याकडे प्रभार
जिल्हा कार्यालयातील सायबर सेल विभागातील पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना मुकुटबन पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे. मुकुटबन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नाराजी होती. अवैध दारू तस्कर, गोवंश तस्कर, गुटखा तस्कर इत्यादींवर आळा घालण्याचे आव्हान पीआय जाधव यांच्या पुढे आहे. आता अजित जाधव हे याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई. 26 December, 2024

अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई.

वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव 26 December, 2024

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव

सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...

झरी-जामणीतील बातम्या

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

रान डुकरांचा हैदोस, मुकुटबन येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान

झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...