आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव(तालुका प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्था निधी सन 2020-2021 अंतर्गत पंचायत समिती क्षेत्रातील 21 शाळांना शालेपयोगी डिजिटल साहित्य वितरित करण्यात आले. या डिजिटल साहित्याचे वितरण व प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 1 ऑक्टोबर रोजी स्थानिक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून विधानपरिषद सदस्य आ.डॉ.रामदासजी आंबटकर तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. समीरभाऊ कुणावार, पंचायत समितीच्या सभापती सौ.शारदाताई आंबटकर ,जिल्हा परिषद सदस्य ज्योत्स्नाताई सरोदे,पंचायत समिती सदस्य गंगाधरराव कोल्हे, वैशालीताई पुरके, मंगलाताई ठक, संभाजी देवढे,गटविकास अधिकारी दिनेश चौधरी गटशिक्षणाधिकारी अशोक कोडापे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये डिजिटल साहित्य प्राप्त शाळांना साहित्याचे वितरण करून या साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी करण्याच्या संदर्भामध्ये प्रशिक्षण देण्यात आले.याप्रसंगी बोलताना आ. समीरभाऊ कुणावार यांनी शाळांच्या भौतिक व गुणवत्ता विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले. त्याच प्रकारे आ.रामदासजी आंबटकर यांनी पंचायत समिती अंतर्गत उर्वरित सर्व उच्च प्राथमिक शाळाना डिजिटल साहित्य पुरवण्यात साठी योग्य ते प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तंत्रज्ञानाच्या साह्याने विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करण्यासाठी शिक्षकांनी योग्य ते प्रयत्न करावेत ही अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे नियोजन विस्तारअधिकारी श्री. सुभाष टाकळे ,श्री. अरविंद राठोड, विलास आटे व सर्व शिक्षा अभियान च्या संपूर्ण कर्मचारी यांनी केले. या प्रशिक्षणामध्ये तंत्रस्नेही शिक्षक श्री. शरद ढगे यांनी शिक्षकांना डिजिटल साहित्य हाताळणी संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शन करून शिक्षकांच्या शंकांचे समाधान केले.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...