शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व मॅराथॉन स्पर्धा.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
Reg No. MH-36-0010493
घुग्घुस: गुरुवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते घुग्घुस परिसरातील वेकोलीकडून नव्याने निर्माण केलेल्या जिओसी कोळसा खाण ते बहिरमबाबा मंदिराच्या मागेहून बेलोरा पुलापर्यन्त निघणाऱ्या पर्यायी नवीन वळण मार्गाचा श्रीगणेशा करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, घुग्घुस शहरातून होणारी कोळश्याची जडवाहतूक शहराच्या बाहेरून व्हावी, यासंदर्भात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 27 सप्टेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली.
याबैठकीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वेकोलीचे अधिकारी तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
दिवसेंदिवस घुग्घुस शहरातून कोळश्याची जडवाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने, प्रदूषण वाढले तसेच अपघाताची शक्यता निर्माण झाली. यामुळे भाजपाने या बैठकीत शहरातून होणारी कोळश्याची जडवाहतूक बंद करण्यात यावी आणि वेकोलीने पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. त्यानुसार वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. उदय कावळे साहेब यांचेशी सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर, पर्यायी वळण रस्त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वेकोलीचे महाप्रबंधक उदयजी कावळे यांचेसह दोनदा नविन रस्त्याची पाहणी केली आणि रस्त्याच्या निर्माण कार्यास सुरवात झाली.
या दरम्यान, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी सुद्धा वेकोलीच्या अधिकार्यांसह स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना घेऊन रस्त्याची पाहणी केली.
या नव्या रस्त्याच्या निर्मितीसाठी वेकोली प्रशासनाने एक महिण्याचा अवधी मागितला, आणि लवकरच शहरातून होणारी कोळश्याची जडवाहतूक या नवीन रस्त्याने वळती करण्यात येईल, असा शब्द दिला होता.
आता हा नवा पर्यायी रस्ता तयार झाला असून यामार्गे कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक होणार आहे.
यामुळे घुग्घुस शहर वासियांना वाहतुकीच्या त्रासापासून व प्रदूषणापासून मुक्ती मिळणार आहे. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने घुग्घुस वासियांची ही रास्त मागणी पूर्ण झाली तसेच वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदयजी कावळे यांनी हा पर्यायी नवीन रस्ता अतिशय कमी वेळात पूर्ण करून दिला. त्याबद्दल त्यांचे आभार भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी मानले व भाजपचा हा लढा यशस्वी झाला आहे. असेही ते म्हणाले.
यावेळेस पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, भाजपाचे मोमीन शेख, मल्लेश बल्ला, अजय आमटे, सिनू इसारप, कोमल ठाकरे, विक्की सारसर उपस्थित होते.
वणी : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता...
*पोटेगांव सर्कलच्या समस्या खासदार किरसान यांनी जाणुन घेतल्या* ✍️गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-चिमूर लोकसभा...
वणी :शहराचं सुसज्ज आणि अत्याधुनिक व्यापार पेठ म्हणून यवतमाळ रोडवरील शेवाळकर व्यापारी संकुलाकडे पाहिले जाते. याच व्यापारी...
*सावंगी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार रेती घाट मालकाने विनापरवानगी चक्क खांबावरचे दिवे बदलले* ✍️मुनिश्वर बोरकर ...
वणी:- वणी नगरपरिषद शताब्दी महोत्सवानिमित्त भव्य शहर स्तरीय भिंतीचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्वच्छ भारत...
*प्रशासनाची दिरंगाई कंपनीची मुजोरी* *आदिवासी कोलामाचे शोषन गुन्हे दाखल करावेत* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...