आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
बि.पी.ठाकरे रक्तपेढी सील करण्यात आली
अकोला (प्रती): मुर्तीजापुर तालुक्यातील हीरपूर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला उपचारार्थ शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी पांढऱ्या पेशी कमी असल्याचे सांगून अकोल्यातील बी.पी ठाकरे रक्तपेढीतून रक्त मागविण्यात आले परंतु ते रक्त एचआईव्ही पॉजिटिव व्यक्तिचे असल्याने आठ वर्षाच्या निष्पाप बालिकेला ही एचआयव्ही संक्रमित व्हावे लागले आहे तिच्या वर उपचार सुरू असताना बि.पी.ठाकरे रक्तपेढीतून संकलित केलेले रक्त देण्यात आले.
परंतु तिच्या पेशी वाढत नव्हत्या त्यामुळे तिला अमरावती येथील रुग्णालयात हलविले येथील डॉक्टरांना एचआयव्ही असल्याचा संशय आल्याने बालिकेची तपासणी करण्यास सांगितले तपासणीअंती तीचा अहवाल पॉझिटिव आला बीपी ठाकरे या रक्तपेढी मधुन रक्त देण्यात आले होते रक्तपेढी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व पैशाच्या हव्यासापोटी एका निष्पाप मुलीचा जीव धोक्यात आला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी पुढाकार घेऊन संबंधित रक्तपेढी ही सील करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा उपाध्यक्ष रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना अकोला उमेश सुरेशराव इंगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली होती.
या मागणीची दखल घेत आज जिल्हाधिकारी यांनी वरील प्रमाणे झालेला प्रकार पुनश्च होउ नये या दृष्टीने उक्त प्रकरणामध्ये पुढील कार्यवाही होईपर्यंत बी. पी. ठाकरे मेमोरीयल रक्तपेढी, रामनगर, अकोला या प्रतिष्ठानाला तात्काळ सीलबंद करण्याकरिता आदेश निर्गमीत केले असल्याने आज मनपा आयुक्त नीमा अरोरा यांच्या आदेशान्वये श्री बी.पी. ठाकरे मेमोरीयल रक्तपेढी या प्रतिष्ठानावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...