वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रवीण उद्धवराव गायकवाड (राळेगाव तालुका प्रतिनिधी): दिग्रस येथील देवनगर परिसरात शेकडो कुटुंब गेल्या दोन पिढ्यांपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करुन राहात आहेत, त्यातील सुरवातीस पात्र ठरलेल्या २२१ कुटुंबाला त्यांच्या नावाचे लिजपट्टे आमदार संजय राठोड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. आणी ७ जानेवारी हा देवनगर वासियांकरीता सुवर्ण व ऐतिहासिक दिवस ठरला.
तत्कालीन महसूल राज्यमंत्री विद्यमान आमदार संजय राठोड यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाल्याने त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.शासकीय जागेवरील अतिक्रमण धारकांना त्यांच्या नावाने जागा करण्याचा निर्णय हा संरक्षित झोपटपट्टीलाचा लागू होता हा नियम शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या इतर अतिक्रमण धारकांना नव्हता ही सुविधा इतर नागरिकांना सुद्धा मिळावी या करीत तत्कालीन महसूलराज्यमंत्री आमदार संजय राठोड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सतत पाठपुरावा केला आणी त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले आणी शासनाच्या जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांना काही शर्ती व अटीवर लीज पट्टे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणी यानिर्णयाची अंबलबजावणीसुरु झाली महाराष्ट्रातून सर्वप्रथम याचा लाभ दिग्रस विधानसभेच्या नेर व दिग्रस तालुक्याला झाला. दिग्रस-दारव्हा-नेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे तत्कालीन महसूल राज्यमंत्री आमदार संजय राठोड यांनी हे अशक्य काम शक्य करुन दाखविले.
देवनगर परिसरातील शासकीय जागेवर अतिक्रमण धारकांना त्यांच्या हातात जागा नावी असलेले लिजपट्ट्याचे प्रमाणपत्र मिळून देण्याकरिता आमदार संजय राठोड हे महसूल राज्य मंत्री असतांनाच त्यांनी प्रयत्न केले होते, त्याचेच हे फलीत असल्याने देवनगर परिसराचे नगरसेवक केतन रत्नपारखी यांनी लिजपट्टे वाटपाचा कार्यक्रम शुक्रवार ०७ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता देवनगरात आयोजित केला होता.आमदार संजय राठोड यांच्या हस्ते पहिल्या अकरा जणांना त्यांच्या हक्काच्या जागेचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले तर उर्वरित लिजपट्टे त्या प्रभागातील नगरसेवकांच्या उपस्थितीत नगर पालिका कर्मचाऱ्यांनी वाटप केले.
लीज पट्टे मिळाल्याने या नागरिकांना ०७ जानेवारी हा एक सुवर्ण व ऐतिहासिक दिवस ठरल्याने उपस्थितांनी आमदार संजय राठोड यांचे टाळ्यांच्या कडकडाटात धन्यवाद मानत आनंद व्यक्त केला तर लिजपट्टे मिळाल्याने पंतप्रधान आवास योजनेचा लाभ सुद्धा मिळणार असल्याने देवनगर वासियांतून समाधान व्यक्त होत आहे. माजी नगराध्यक्ष विजय बंग यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या लिजपट्टे वाटप सोहळ्यास नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे,बांधकाम सभापती नुरमहंद खान,शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर,जिल्हा नियोजन समितीचे सुधीर देशमुख यांची मंचावर उपस्थिती होती संचलन संदीप रत्नपारखी यांनी केले तर प्रास्ताविक नगरसेवक केतन रत्नपारखी यांनी केले. या प्रसंगी नगर परिषदेचे अभियंता, बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व देवनगरवासी उपस्थित होते.
मी बोलून नाही तर करून दाखवतो – आमदार संजय राठोड
पिढयान पिढ्या पासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे या करीता मी महसूलमंत्री असतांना सतत पाठपुरावा केला या करीता उदभवणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडविल्या आणी माझ्या प्रामाणिक प्रयत्नाना यश मिळाले आणी त्याचेच फलित म्हणून आज देवनगर वासियांना लिजपट्टे वाटप करण्याच भाग्य मला लाभलं याचा मला आनंद होत आहे. लवकरच दिग्रस शहरातील भीमनगर,शिवापूर,मोतीनगर भागातील व देवनगरातील उर्वरित अतिक्रमण धारकांना लिजपट्ट्या करिता येत असलेल्या तांत्रिक अडचणी सोडवून लवकरात लवकर लिजपट्टे मिळवून देण्याची ग्वाही आमदार संजय राठोड यांनी या प्रसंगी दिली तर लिजपट्टे मिळवून देण्याकरिता प्रस्ताव तयार करून त्याचा आमदार संजय राठोड यांच्याकडे सतत पाठपुरावा व कागदपत्रांची पूर्तता करणारे संजीव चोपडे, नगरसेवक केतन रत्नपारखी, तसीलदार सुधाकर राठोड, नगरअभियंता किशोर दरेकर,कनिष्ठ अभियंता सोमनाथ सदगर, बांधकाम लिपिक गोपाल गवळे यांचा आमदार संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...