वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी): तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक२२/१२/२०२१ रोज बुधवारला गणिततज्ञ श्रीनिवास रामानूजन यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित/ विज्ञान समिती प्रमुख तथा गणित विषयाचे विषय शिक्षक विशाल मस्के सर यांनी करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व सोबतच गणित तज्ञ श्रीनिवास रामानूजन यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
त्यानंतर विद्यालयाचे विद्यार्थी कु प्रतिक्षा देशमुख व कु यशस्वी रामगडे यांनी पायथागोरसचा सिद्धांत , कु पायल ढुमणे,कु मयुरी मरस्कोल्हे यांनी एकरूप त्रिकोण, समरूप त्रिकोण, कु भाग्यश्री मासुरकर, कु दिव्या वैद्य यांनी संभाव्यता,कु सानिका ढुमणे, कु आचल पानसे यांनी त्रिकोण, आदेश वाघमारे,रोशन पवार यांनी वर्तुळ, कु सोनिया चव्हाण, कु हर्षदा ठोबंरे, यांनी चौकोन, कु दामिनी लटारे,कु हर्षदा भडे यांनी गोल व वर्तुळ ,कु प्रियंका संगेवार,कु हिमानी ठोबंरे यांनी बेरीज ,वजाबाकी तर साहिल लटारे व यश भगत तिरपा गुणाकार असे समजून सांगून प्रात्यक्षिक करून दाखविले व माहिती सांगितली.
त्यानतंर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक, शाळेचे माजी विद्यार्थी, सहाय्यक विक्रीकर आयुक्त अनिल खडसे यांनी विद्यार्थ्याना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.सोबतच ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते अथक परिश्रम केल्याने यश मनुष्याच्या पदरी पडतं असे सांगितले.कार्यक्रमाचे शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी विद्यार्थ्याना मोलाचे अध्यक्षिय मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेंकर सर यांनी केले तर श्रावनसिंग वडते सर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक दिगांबर बातुलवार सर, रंजय चौधरी सर, स्वाती नैताम मँडम, सौ वंदना वाढोणकर मँडम, मोहन बोरकर सर, कु वैशाली सातारकर मँडम, सौ कोल्हे मँडम, कु. तिजारे मँडम, अमित बातुलवार सर,तथा शिक्षकेत्तर कर्मचारी बाबुलाल येसंबरे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल मस्के सर यांनी अथक परिश्रम घेतले.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...