आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राळेगाव (तालुका प्रतिनिधी) : राळेगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने एकत्रित येऊन महासंघ स्थापन करून शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या सोडविण्याबाबत समन्वय महासंघाच्या वतीने मा. गटशिक्षणाधिकारी, राळेगाव यांना दिनांक 18/10/2021 रोजी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शिक्षण विभागातील संगणकीय शालार्थ संदर्भात मुख्य जबाबदारी एम. आय. एस. कॉडॅनिटर यांचेकडे सोपविण्यात यावी; सर्व शिक्षकांचे सेवापुस्तक अद्यावत करण्यात यावे; १००% शिक्षकांचे स्थायीत्व व भाषा हिंदी सूट विषयाची नोंद करणे तसेच प्रमाणपत्र देण्यात यावे.
दरमहा वेतनाचे पत्रक केंद्रस्तरावर pdf स्वरुपात उपलब्ध करणेबाबत; कु. पोकळे, श्री. केराम, श्री. परचाके, श्री इंझाळकर कु.उमक यांचे सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता खात्यात जमा करणेबाबत; नवनियुक्त वेतनश्रेणी प्राप्त विज्ञान-गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांची थकबाकी अदा करणेबाबत; चटोपाध्याय लागलेल्या शिक्षकांची थकबाकी अदा करणेबाबत; कोरोना काळातील उन्हाळी सुटीतील वाहन भत्ता अदा करणेबाबत; महाराष्ट्र बँकेत खाते उघडने करिता स्थगिती मिळणेबाबत; सादिल ची रक्कम शाळेला उपलब्ध करून देणे बाबत; सेवेची २४ वर्ष झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी बाबतचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयात सादर करणेबाबत; आपसी आंतरजिल्हा बदली शिक्षकांची सेवाजेष्टता मूळनियुक्ती दिनांकापासून कायम करण्याबाबत; शिक्षक समस्या निवारणाची सभा नियमित आयोजीत करण्याबाबत; शिक्षकांचे वेतन दर महिण्याच्या 1 तारखेलाच करण्यात यावे. या सर्व समस्यांचे निवरणाबाबत मा. गटशिक्षणाधिकारी श्री. अनिल राऊत यांनी शिक्षण विभागातील लिपिक श्री. थुटे, श्री. केराम, श्री. झलके यांना उपस्थित ठेवून सर्व समस्या निकाली काढण्याबाबतचे मौखिक आदेश यावेळी देण्यात आले. संबंधितांनी सुद्धा सर्व समस्या निकाली काढू असे सांगितले. यावेळी राळेगाव तालुका शिक्षक संघटना समन्वय महासंघातील निमंत्रक श्री.रमेशकुमार दवे, श्री. राजेंद्र कोल्हे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी श्री विकास झाडे, श्री जगदीश ठाकरे, श्री मनीष नागतोडे, राजेंद्र पुडके, लक्ष्मण काटकर, राजेंद्र दुरबुडे, मनीष काळे, सागर इंझाळकर, दिलीप चामाटे, अमित चिरडे, सुमित राठोड, प्रविण दरेकर, किशोर आगलावे, रामकृष्ण चंदनखेडे, गणेश देवतळे, हनुमान कोहचाडे, विजय ठाकरे, राजेंद्र दोडेवार उपस्थित होते.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...
राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...
*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...