आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
मारोती डोंगे (कोरपना प्रतिनिधी): राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या निवडणुका पार पडल्या असताना आता राजकीय नेत्यांना सत्तेवर कोण बसेल ? या चिंतेने व्याकुळ झाले आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळाल्यानंतर त्या जागा आता सर्वसाधारण म्हणून आरक्षित झाल्या आहे. या सर्व जागांसाठी पुन्हा नव्याने निवडणुका होऊ घातल्या आहे. त्यातही काही नगरपंचायती रोमांचक स्थितीमध्ये आहे. अशीच काहीशी रोमांचक स्थिती कोरपना नगरपंचायत निवडणुकीत बघायला मिळत आहे. या सर्वामध्ये मात्र सत्ताधारी आधी झालेल्या १४ प्रभागामध्ये आपलाच विजय अशा चर्चा रंगवल्या जात आहे. वास्तविकता तर काही वेगळीच बघायला मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून सत्ताधारी गट कोरपना शहरात आधी ग्रामपंचायत आणि गेल्या पंचवार्षिकी पासून नगरपंचायतीमध्ये सत्ता उपभोगत आहे. दरवेळी विरोधक एकत्र यायचे, पण सत्ताधारी गटाकडून काही गोष्टी पसरवून विरोधकात एकमत होण्यास बाधा टाकत व आपली सत्ता कायम राखत. परंतु या निवडणुकीमध्ये मात्र युवाशक्तीचा निर्धार, विरोधकांचा विश्वास आणि जनतेकडून मिळालेली साथ या सगळ्यांची मोट बांधून एकत्र निवडणूक लढवली. विरोधक एकवटले ते फक्त सत्तेसाठी अशा भ्रामक पद्धतीच्या चर्चा रंगवून सत्ताधारी गट अफवा पसरवत आहे. या सर्वामधून तर सत्ताधारी गटाचे कलंकित राजवट आणि केंद्रीकृत झालेल्या सत्तेचा अहंकार दिसून येत आहे. वास्तविक पाहता अविरत मिळालेल्या सत्तेचा अहंकार हा कशाच्या आणि कुणाच्या भरवश्यावर? तो तर मतदारानी बजवलेल्या हक्कामुळे आणि दिलेल्या साथीमुळे. दरवेळी ज्या विचारांना मतदारानी साथ दिली, तीच साथ यंदा मात्र विरोधकांच्या परिवर्तनला मिळाली आहे. सत्ताधारी गट प्रचारसभेमध्ये विरोधकांना खिचडी म्हणताना ते स्वतः मात्र राज्यात मागच्या दरवाज्याने निर्माण केलेल्या आघाडीला स्पेशल विसरून गेले. निवडणूक प्रचारा दरम्यान विरोधकांवर भ्याड हल्ले करण्यातूनच सत्ताधाऱ्यांची पराभूत मनोवृत्ती दिसून येत आहे.
ज्या विकासकामांच्या भरवश्यावर निवडणूक लढवत आहे. त्याच विकास कामाचापुरता बोजवारा वाजला आहे. अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि रस्त्याला मधोमधून गेलेल्या तडा यांसर्वावर पांघरुन घालून प्रभाग क्र 1, 2 आणि 17 या सर्वांमध्ये निवडणुकीत सत्ताधारी आपली बाजू सावरणार की आधीच्या प्रभागाप्रमाणे पण पराभूत मानसिकतेतून निवडणुका लढविणार हे आता येणारा काळच ठरवेल..
आजुबाजुच्या गावातील नागरिकांमध्ये कोरपना नगरपंचायत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधील रंगतीमुळे निवडणुकीवर जोरदार चर्चा घडून येत आहे. सगळीकडे विरोधकांच्या परिवर्तन पॅनलचाच बोलबाला दिसून येत आहे. विरोधकांवर पराभूत मानासिकतेतून केलेला हल्ला निवडणूकीमध्ये केलेला अपप्रचार यासर्वांमुळे सत्ताधाऱ्यांचीच काही नेते मंडळी व्ययक्तिकरित्या नाराज झाले आहे. या नाराजी मधूनच ते अप्रत्यक्षरित्या परिवर्तनला साथ देत आहे, अशा चर्चामुळे ऐन कडाक्याच्या थंडी मध्ये कोरपना शहरात वातावरण मात्र तापायला लागले.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...