Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्घुस शहरात एआयएमआयएम...

चंद्रपूर - जिल्हा

घुग्घुस शहरात एआयएमआयएम ची जोरदार एंट्री

घुग्घुस शहरात एआयएमआयएम ची जोरदार एंट्री

घुग्घुसचा नगराध्यक्ष एआयएमआयएमचा बसवू -जावेद पाशा

देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): शनिवार 8 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बालाजी लॉन, घुग्घुस येथे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने "हमारा काम ही हमारी पहचान है" असा नारादेत भव्य पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला. अनेक युवकांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेत एआयएमआयएम पक्षाने घुग्घुस शहरात जोरदार एंट्री केली आहे त्यामुळे अनेक राजकीय पक्षाच्या भुवया उंचावल्या आहे.

यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जावेद पाशा महाराष्ट्र प्रवक्ता व जिल्हाप्रभारी, नाहिद हुसैन जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, अजहर  शेख शहराध्यक्ष चंद्रपूर सैय्यद अमान अहेमद जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर, शाहिद शेख जिल्हा युथ अध्यक्ष चंद्रपूर ताहिरा शेख महिला संघटक विदर्भ प्रदेश, शबाना शेख महिला जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, आयशा शेख महिला शहराध्यक्ष चंद्रपूर समीर मिर्झा शहर प्रभारी घुग्घुस उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. याप्रसंगी घुग्घुस येथील अनेक युवक, पुरुष व महिलांनी पक्षात प्रवेश घेतला प्रमुख पाहुण्यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलतांना प्रमुख पाहुणे प्रा. जावेद पाशा महाराष्ट्र प्रवक्ता व जिल्हा प्रभारी हे म्हणाले येणाऱ्या घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीत एआयएमआयएम पूर्ण ताकतीने उतरणार आहे. आमची भूमिका केवळ निवडणूक लढण्याची नसून घुग्घुसचा प्रथम नगराध्यक्ष हा एआयएमआयएम पक्षाचा बसवू असा आमचा विश्वास आहे. घुग्घुसच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन काम करू सत्ता हस्तगत करणे हा आमचा उद्देश आहे निश्चितच घुग्घुस नगर परिषदेची सत्ता आम्ही काबीज करू असा विश्वास व्यक्त केला.

साजिद सिद्दीकी शहराध्यक्ष घुग्घुस, अख्तर हुसैन शहर उपाध्यक्ष घुग्घुस, इरशाद वाहिद शहर महासचिव घुग्घुस, इसराईल शाह शहर सचिव घुग्घुस, जुल्फकार शेख कोषाध्यक्ष घुग्घुस, एजाजुद्दीन शेख मीडिया प्रभारी घुग्घुस, सोहेल शेख युथ शहराध्यक्ष घुग्घुस, शमा खान वार्ड क्र.4 शाखा अध्यक्ष, नूरजहाँ कुरेशी वार्ड क्र.3 शाखा अध्यक्ष, शबनम खान वार्ड क्र.2 शाखा अध्यक्ष यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

संचालन नौशाद सिद्दीकी यांनी केले व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. यावेळी मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...