खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप असल्याने सर्व बसेस सेवा बंद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील येणाऱ्या नागरिकांच्या दुचाकीवरील कारवाया थांबविण्यात याव्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना आज ता. २० रोजी देण्यात आले आहे. राज्यातील एस.टी. महामंडळाची प्रवासी सेवा ठप्प असल्याने वाणीतही बस सेवा मागील २० दिवसापासून खंडित झाली आहे. बस म्हणजे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवास्यांची नाळ आहे. त्यामुळे बसच बंद असल्याने प्रवास करणे अत्यंत अवघड झाले आहे. पर्यायाने नागरिकांना एकाच दुचाकीवर तीन तीन जण प्रवास करताना दिसून येत आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या मालमाहू वाहणातूनही प्रवासी प्रवास करीत आहे. कारण असा प्रवास करणे ही प्रवाश्यांची गरज निर्माण झाली आहे. परंतु शहरा जवळ आले की आपल्या शाखेचे कर्मचारी वाहने अडवून त्यांच्यावर कार्यकाही करीत आहे. त्यांची अडवणूक करून त्यांच्याकडून दंड वसूल केल्या जात आहे. यामुळे गोरगरीब रोज मजुरीच्या लोकांना चांगलाच फटका बसत आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य नागरिक भरडल्या जात आहे त्यामुळे जो पर्यंत एसटी ची प्रवशी सेवा सुरळीत होत नाही तो पर्यंत कोणत्याही दुचाकी धारकांना अडविण्यात येऊ नये व त्यांचेकडून कोणताही दंड वसूल करण्यात येऊ नये अश्या मागणीचे निवेदन वंचितचे जिल्हाउपाध्यक्ष मंगल तेलंग यांचे मार्गर्शनाखाली तालुकाध्यक्ष दिलीप भोयर यांचे नेतृत्वात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाउपाध्यक्ष नरेंद्र लोणारे महासचिव सतीश गेडाम शहराध्यक्ष किशोर मुन रवी कांबळे, गौतम जीवने, रोहित कोठारे,संतोष गेडाम,मिलिंद नगराळे, राहुल मलपल्लीवार, मयूर मेश्राम, अभिजात साखरे, प्रशांत चांदनखेडे, मनोज नवले, मनोज मोडक, नरेश नाकले, आदि उपस्थित होते. अशी माहिती तालुका प्रसिद्धी प्रमुख रमेश तांबे यांनी कळविले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...