Home / चंद्रपूर - जिल्हा / स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी...

चंद्रपूर - जिल्हा

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी कोरपना येथे रास्ता रोको..!

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी कोरपना येथे रास्ता रोको..!

महामार्ग रोखला,वाहनाच्या लागल्या लांबच लांब रांगा

मारोती डोंगे (कोरपना) - विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका कोरपना च्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी रास्ता रोको आंदोलन कोरपना येथील बस स्थानक परिसरात करण्यात आले. या आंदोलनामुळे तब्बल एक तास चंद्रपूर - आदीलाबाद राष्ट्रीय महामार्ग व वणी राज्य महामार्ग रोखला गेला होता. यामुळे रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागला गेल्या होत्या.
आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले यांनी केले. या आंदोलनात स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित देण्यात यावे, कोरोना काळातील वीजबिल माफ करण्यात यावे, शेती पंपाचे वीज बिल माफ करण्यात यावे, जमिनीचे पट्टे देण्यात यावे, पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द करण्यात यावी, साप चावून मरणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना इतर वन्य प्राण्याप्रमाणे तात्काळ मदत देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे बंडू राजूरकर, रमाकांत मालेकर, रवि गोखरे, मदन सातपुते, पद्माकर मोहीतकर, भास्कर मत्ते, रत्नाकर चटप, सुभाष तुरानकर,अविनाश मुसळे, श्रीनिवास मुसळे, प्रभाकर लोडे, अरुण काळे, गुड्डू काकडे, विकास दिवे, विपीन इंगोले, पांडुरंग वासेकर, गजानन राजूरकर, सुनील आमने, दिनेश खडसे, मोहितकर आदी सह शेकडो नागरिक उपस्थित होते.

आंदोलकांनी ॲम्बुलन्स ला करून दिली मोकळी वाट

विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे कोरपना येथे आंदोलन करण्यात आले. यादरम्यान ग्रामीण रुग्णालयातून चंद्रपूर जाणाऱ्या रुग्णवाहिकेला आंदोलकांनी वाट मोकळी करून दिली.

आंदोलनाला विविध संघटनेचा पाठिंबा

आंदोलनाला शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, जन सत्याग्रह संघटना आदींनी पाठिंबा दर्शवला. आणि सक्रिय सहभाग घेतला.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...