वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची विज वितरण कार्यालयात धडक
गोंडपिपरी (प्रतिनिधी): तालुक्यात विजेचा लपंडाव ही नित्याचिच बाब झाली आहे. या पंधरवाड्यात तर रात्री-बेरात्री अन भरदिवसासुद्धा विजपूरवठा खंडीत होत आहे. मान्सूनचे दिवसं असले तरी वाटेल तेव्हा लाईन जाण्याचा प्रकार तालुक्यात वाढला आहे. परिणामी गोंडपिपरी शहरासह ग्रामिण भागातील नागरिक आता त्रस्त झाले आहेत. यामूळे तालुक्यात वेळी-अवेळी होणारा विजेचा लपंडाव थांबवा आणि सुरळीत विद्यूत पूरवठा करावा, या मागणीला घेऊन बूधवार दि.१६ जून ला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विज वितरण कंपणीचे कार्यालय गाठले. यावेळी शिवसेनेचे हरमेलसिंग डांगी यांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळाने निवेदन देत विजेचा लपंडाव थांबवण्याची मागणी केली.अन्यथा कंपणीच्या भोंगळकारभाराविरोधात आंदोलनाचा ईशाराही यावेळी देण्यात आला.
गोंडपिपरी तालुक्यात विजेचा लपंडाव ही नेहमीचीच बाब झाली आहे. सद्या पावसाचे दिवस असल्याने पाऊस असो वा नसो,वादळवारा असो किंवा नसो विजपूरवठा अधून-मधून,वेळी-अवेळी खंडीत होत असतो.यामूळे गोंडपिपरी शहरासह ग्रामिण भागांतील नागरिक त्रस्त झाले आहेत.अलिकडेच "ब्रेक द चेन" नंतर आता जनजीवन हळूहळू रुळावर येतांना दिसत आहे. शहरातील दूकाने उघडू लागली.असे असतांना विजेचा लपंडावाचाफटका लघूव्यावसायिकांना बसत आहे. ग्रामिण भागातील पाणिपुरवठा योजना देखिल यामूळे प्रभावित झाल्या आहेत. विजपूरवठा अधून-मधून खंडित होत असल्याने महिलांना देखिल भर पावसात पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. यातच मागिल दोन वर्षापासून अधूनमधून होत असलेल्या सततच्या लाॕकडाऊननंतर देखिल ही सामान्य जनता निमूटपणे विजबिलांचा भरणा करित आहे.तेव्हा त्यांना सुरळीत सेवा देण्याऐवजी हलगर्जीपणा करित आहे.यासाठी म्हणून बुधवारी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विज वितरण कंपणीचे कार्यालय गाठले. यावेळी शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष हरमेलसिंग डांगी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने विजेचा लपंडाव थांबवण्याची मागणी केली.अन्यथा कंपणीच्या भोंगळकारभाराविरोधात आंदोलनाचा ईशाराही दिला आहे.यावेळी राष्ट्रवादीचे अरुण वासलवार, काँग्रेसचे महेंद्र कुनघाडकर, गोंडपिपरी यंग ब्रिगेडचे सुरज माडूरवार, तारडाचे सरपंच तरुण उमरे, शिवसेनेचे आनंदराव गोहणे, बळवंत भोयर,भगवान कुमरे आदिंची उपस्थिती होती.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...