वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर जिल्हा सरपंच संघटने कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन -सरपंच गणेश चवले
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतींना महाराष्ट्र राज्य विधुत कंपनीकडून ग्रामपंचायतीच्या हद्दीतील व पथदिव्याच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी सूचना देण्यांत आलेल्या असून सदरचे विधुत बिल थकीत होऊन रक्कम वसुली न दिल्यास संबंधित ग्रामपंचायतीचा विधुत पुरवठा खंडित करण्यात बाबत विधुत वितरण कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर यांनी आपल्या कडील दिनांक १६/०६/२०२१ चे पत्रानुसार संबंधित ग्रामपंचायतीचा महाराष्ट्र शासनाकडून १५ व्या वित्त आयोग निधीतून वीज बिलाचा भरणा करण्या बाबतचा सूचना देखील दिलेल्या आहे.
वास्तविक पाहता मागील व दोन वर्षापासून संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा प्रधुरभाव असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या महत्त्वाचे आर्थिक स्रोत म्हणजे कर वसुली बंद आहे व ग्रामपंचायतीना कर वसुली शिवाय इतर दुसरा कोणताही आर्थिक स्त्रोत नाही त्यामुळे सदरची थकीत वीज बिलाची रक्कम जिल्हा परिषद चंद्रपूर यांनीच भरावी. तसेच महाराष्ट्र शासनाकडून १५ व्या आयोग निधीतून वीज बिलाचा भरणा करणाबाबतच्या सूचना या संबंधीत ग्रामपंचायतीना प्राप्त झालेल्या आहें. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे थकीत विधुत बिल सुद्धा प्रत्येक याच निधीतून भरणा करीत आहे. त्यामुळे निधीची कमतरता तसेच जास्तीत जास्त म्हणजेच अनेक ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिति ही हलाकीची व दयनीय आहे.
१५ व्या वित्त आयोगाकडू ग्रामपंचायतीना आधीच अपूर्ण निधीं उपलब्ध झालेला आहे व त्यातच थकीत वीज बिलाची रक्कम ही अतिशय जास्त आहे, आणि सदरची निधी हा फक्त विधुत करीता वापरल्यास ग्रामपंचायत अंतर्गत आदिवासी तांडा क्षेत्र, दलित वस्ती, व मागासवर्गीय वस्तीतील व संपूर्ण विकास कामे व पाणी पुरवठा योजना बंद पडण्याचा धोका आहे, यामुळे वरील सर्व बाबी या विचारात घेता महाराष्ट्र राज्य विधुत कंपनी कडून थकीत वीज बिलाची मागणी ही थांबविण्यात येऊन सदरचे थकीत बिल हे जिल्हा परिषद चंद्रपुर यांनीच भरणा करावा व जिल्ह्यातील ग्रामपंचतीचा वीज प्रवाह पुरवठा महाराष्ट्र राज्य विधुत वितरण कंपनीने खंडित करू नये व याबाबतचे आदेश पारित करण्याबाबतचे निवेदन श्री गणेश दामोदर चवले सरपंच एकोना तहसील वरोरा यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व सारपंचाचे शिष्टमंडळाने श्री उद्धव ठाकरे साहेब ( मुख्यमंत्री) यांना निवेदनातून केलेली असून मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना आज दिनांक २८/०६/२०२१ रोजी प्रत्यश भेटून व निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सोबत रुपवंती मधुकर दरेकर सरपंच आनंदवन, सौ.योगिता लीलाधर पिंपळशेंडे माजी सरपंच मारडा, श्री देवानंद मोतीरामजी महाजन सरपंच माढेळी, विजेन्द्र बाबाराव वानखेडे सरपंच पाटाळा, बालाजी रामचंद्र जीवतोडे सरपंच शेबळ, श्री अरुण भाऊ खारकर ,सौ शाबुबाई प्रकाश उताने सरपंच वनोज, सौ अंजु रुपेश लांडे ग्राम पंचायत सदस्य,सौ निर्मला सुनील दडमल सरपंच पाझुणी, गजानन तिरुपती पाटील, मनोरह भाऊ डोरलीकर, गजानन भाऊ काळे, साहेबराव ठाकरे , श्रीकृष्ण जी धुरपुढे वासुदेव भाऊ ठाकरे, सुरजजी मेश्राम, बालाजी काळे, तहूर शेखजी इत्यादी उपस्थित होते .
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...