शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
मुंबई, दि.28 (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सुरू असलेले कडक निर्बंध आणखी दोन आठवडे, म्हणजेच 15 मे पर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज याचे सूतोवाच केले. दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा स्थिरावला असला तरी राज्यातील कोरोनाची स्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नसल्याने निर्बंधाची मुदत वाढवण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली व परवा याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर राज्यात 15 एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 15 एप्रिल ते 1 मे पर्यंत अशी 15 दिवसांच्या कडक निर्बंधाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. हे निर्बंध 1 मे रोजी सकाळी 7 वाजता संपणार आहेत. मात्र राज्यातील स्थितीत अजूनही म्हणावी तशी सुधारणा झालेली नसल्याने निर्बंध वाढवावे लागणार, अशी चर्चा सुरू होती. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर बराच खल झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात रोज 60 ते 65 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. ही संख्या वाढलेली नसली तरी अजून म्हणावी तशी कमीही झालेली नाही. शहरी भागातील स्थिती थोडी नियंत्रणात असली तरी ग्रामीण भागात अजूनही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण असून औषधं, ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवतो आहे. निर्बंध शिथिल केले व रुग्णसंख्या वाढली तर आरोग्यव्यवस्था कोलमडून पडेल. त्यामुळे निर्बंध आणखी काही काळ सुरू ठेवावे, अशी मागणी बहुतांश मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यामुळेच 15 मे पर्यंत निर्बंध सुरू ठेवण्याचा तत्त्वतः निर्णय आज घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंधाचा कालावधी वाढवावाच लागणार असल्याची माहिती दिली. सध्या आपण 30 एप्रिलपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. शेवटच्या दिवशी मुदत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला जाईल, असे सूतोवाच टोपे यांनी केले.
15 दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल, मात्र 15 मे पर्यंत निर्बंध सुरू राहील, असा आपला अंदाज असल्याचे राजेश टोपे यांनी तूर्तास सांगितले आहे.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...