Home / चंद्रपूर - जिल्हा / पोंभुर्णा / चेककोसंबी नं १ ची जिल्हा...

चंद्रपूर - जिल्हा    |    पोंभुर्णा

चेककोसंबी नं १ ची जिल्हा परिषद शाळा तात्काळ सुरू करा - पँथर रुपेश निमसरकार

चेककोसंबी नं १ ची जिल्हा परिषद शाळा तात्काळ सुरू करा - पँथर रुपेश निमसरकार

संतापलेल्या गावकऱ्यांची भेट घेऊन दिला आंदोलनाचा इशारा

देवानंद ठाकरे(घुग्घुस प्रतिनिधि) पोंभुर्णा: तालुक्यातील थेरगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चेक कोसंबी गावात वर्ग १ ते ४ पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. मात्र ही शाळा पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या हेतुपुरस्सर दुर्लक्षामुळे येथील चिमुकले विद्यार्थी गावात शाळा असूनही तिन किलोमीटर अंतरावर थेरगाव येथे दप्तराचे ओझे घेऊन सध्या सुरु असलेल्या वाघाच्या दहशतीत शिक्षणासाठी पायपीट करीत आहेत. ही गंभीर बाब बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील स्वयंघोषित लोकप्रिय असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षेत्रात घडते आहे. असा घणाघात करीत चेककोसंबी नं १ येथील गावकऱ्यांची भेट घेत त्यांचा संताप लक्षात घेऊन येथील बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा तात्काळ सुरू करावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी केली असून आंदोलनाची चेतावणी दिली आहे.

पोंभुर्णा तालुका हा मागास व आदिवासी बहुल क्षेत्र आहे. या भागात शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर अभाव आहे. येथील शैक्षणिक यंत्रणा शिक्षणाची धोरणे प्रभावी पणे राबविण्यात फेल ठरत असून लोकप्रतिनिधीही कुचकामी ठरत आहेत. शासनाची अनेक शैक्षणिक धोरणे आहेत. असे असतानाही चेककोसंबी नं १ मधील विद्यार्थ्यांना गावात जिल्हा परिषद शाळा असून सुद्धा बाहेरगावी जावे लागते ही बाब सुद्धा शासनाच्या शैक्षणिक धोरणाला काळीमा फासणारी आहे. या चेककोसंबी नं १ गावात मोठ्या प्रमाणावर बौध्दांची लोकसंख्या आहे. यात अनेक विद्यार्थीही बौद्धांची आहेत. त्यामुळे येथील बौद्धांची मुले शिकली नाही पाहिजे याकरिता इथले शासन व प्रशासन काम करतांना दिसते आहे. इथल्या प्रशासनाने ही जातीय द्वेशभावनेतून तात्काळ बाहेर येऊन बंद पाडण्यात आलेली शाळा तात्काळ सुरु करावी आणि बाहेरगावी शिकत असलेल्या मुलांना परत याच शाळेत पाठविण्यासाठी मदत करावी अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने चेककोसंबी नं १ च्या गावकऱ्यांचा व विद्यार्थ्यांचा आक्रोश पंचायत समिती कार्यालयावर धडकल्या शिवाय राहणार नाही असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष सचिन आत्राम, बालाजी मेश्राम, सुमीत धोडरे, निशाल मेश्राम, मंगल लाकडे व गावकऱ्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

पोंभुर्णातील बातम्या

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या वेळेस उत्खनन*

*कूलथा रेतीघाटवरील अवैद्य रेती तस्करांचा सन्नाटा सपाटा* *अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे हजारो ब्रासचे रात्रच्या...

पोंभूर्ण येथील अटलबिहारी वाजपेयी ईकोपार्कचे लवकर नूतनीकरण करा

** पोंभूर्णा शहरात अटल बिहारी वाजपेयी हे एकमेव ईकोपार्क असून तालुक्यातील पर्यटणाचे ठिकाण आहे पोंभूर्णा तालुक्याचा...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वेळेवर बसची व्यवस्था करा*

पोंभूर्णा : हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली...