आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): महिला कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप सुरू आहे तो शमण्याची चिन्हं अद्यापही दिसत नाहीयेत. काल. (14 नोव्हेंबर) मंत्रालयासमोर एसटी कर्मचारी असलेल्या एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
13 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे.
एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण शक्य आहे की नाही?
'पगाराचे 10 हजार हातात येतात, यात घर कसं चालवायचं ?'- एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल
आज (14 नोव्हेंबर) मुंबई येथील मंत्रालयासमोर काही कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यावर पोलिसांनी त्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
'आम्ही तुमच्या पाया पडतो. आमच्या मागण्या मान्य करा,' असा आक्रोश त्यांनी केला.
'एसटी महामंडळाचं राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याची मागणी मान्य करा. तेव्हाच हा संप आम्ही मागे घेऊ असं एसटी कर्मचारी संघटनांकडून सांगितलं जातंय.'
विलीनीकरण करण्यासंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली. पण विलीनीकरणाबाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
'हे विलीनीकरण एक दोन दिवसांत करणे शक्य नाही. ही प्रक्रिया किचकट आहे,' असं परिवहन मंत्री अनिल परब हे वारंवार सांगतायेत.
वडाची साल पिंपळाला लावा, अशी मागणी - अरविंद सावंत
धूर्त लोकांच्या चिथावणीला बळी पडू नका असं आवाहन शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केलं आहे.
एसटी, वाहतूक, राज्य सरकार
विलीनीकरणाच्या मागणीबाबत त्यांनी म्हटलं, "वडाची साल पिंपळला लावा अशी मागणी आपण करतोय. होय, मला हे मान्य आहे की नवीन कामगारांना पुरेसा पगार नाही तो वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करू. पण आपणही उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
त्यासाठी पहिले कर्तव्यावर रुजू व्हा त्यातच तुमचे, एस टी महामंडळाचे भले आहे आणि ज्यांच्या जीवावर आपण जगतो त्या प्रवाशांचे आशीर्वाद त्यामुळे आपणांसच मिळतील."
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...