Home / चंद्रपूर - जिल्हा / सहजता म्हणजे अहंकारावर...

चंद्रपूर - जिल्हा

सहजता म्हणजे अहंकारावर नियंत्रण.. ! आचार्य ना.गो.थुटे यांचे प्रकट मुलाखतीदरम्यान विचारमंथन.

सहजता म्हणजे अहंकारावर नियंत्रण.. ! आचार्य ना.गो.थुटे यांचे प्रकट मुलाखतीदरम्यान विचारमंथन.

वरोरा (प्रतिनिधी ) :   सहजता,साधेपणा हा मनुष्याचा नैसर्गिक स्वभावगुण असतो परंतु प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा यामुळे अहंकार ऊसळी मारत असतो.यांवर आपल्याला नियंत्रण ठेवता आले पाहीजे.महत्वाचे म्हणजे आपल्या विरोधक लोकांबाबतही असुया नसली पाहिजे.म्हणजे सहजता ही स्वभावातील सवय बनते,असे मुलगामी चिंतन प्रख्यात साहित्यीक आचार्य ना.गो.थुटे यांनी व्यक्त केले.जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र व्दारा आयोजित संत नामदेव यांच्या स्मृतीदिनाचे औचित्याने दि.३जुलै रोजी वरोरा येथे आयोजित प्रकट मुलाखतीदरम्यान त्यांनी वरील विचार व्यक्त केले.

साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ.निर्मला पाटील,नागपुर जिल्हाध्यक्ष प्रा.संजीव कोंडेकर यांच्या संकल्पनेतुन ना.गो.थुटे यांच्या निवासस्थानी हि मुलाखत संपन्न झाली.थुटे यांनी वयाची ८२ वर्ष नुकतीच पुर्ण केली असुन " आयुष्याचा अभिलेख " हे दिर्घ आत्मकथन अलीकडेच प्रकाशीत झाले आहे. " गिते स्वागते " या पहील्या कवितासंग्रहा पासुन सुरु झालेल्या साहीत्यिक प्रवासात त्यांनी आजपर्यंत पंचेचाळीस लहान मोठया ग्रंथ आणि पुस्तकांची निर्मीती केली आहे.त्यात अकरा समिक्षाग्रंथ असुन दोन अभ्यासकांचे त्यांच्या साहीत्यावर शोधप्रबंध प्रकाशित झाले आहे.या साहित्यसेवेसोबतच शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने १९८६ मध्येच शिक्षकांसाठीचा राज्यपुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित केले आहे.

 या साहित्यसेवेमुळेच त्यांना साहीत्य क्षेत्रातील "भिष्माचार्य " असे म्हटल्या जाते.या सर्व साहित्य सेवेचा सन्मान म्हणुन साहीत्य परिषदेच्या वतीने गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.संतोष डाखरे आणि संजय गोडे यांनी थुटे गुरुजी यांची प्रकट मुलाखत घेतली.या मुलाखती च्या माध्यमातुन थुटे गुरूजींचा साहीत्यिक प्रवास श्रोत्यांसाठी ऊलगडला.आयुष्याचा अभिलेख हे आत्मकथन म्हणजे मी कसा जगलो,वागलो याचे सत्य आणि प्रांजळ रेकॉर्ड आहे. शिक्षकी पेशात असतांना विद्यार्थ्यांसाठी जे नावीन्युर्ण प्रयोग केले.विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थांचा शैक्षणिक ऊपक्रमात सहभाग वाढला पाहीजे,या भावनेने जे काम केले.त्या शैक्षणिक आणि अन्य साहित्यिक कामाचा लेखाजोखा म्हणजे "आयुष्याचा अभिलेख " असे त्यांनी या आत्मकथनाच्या निर्मितीविषयक प्रश्नाच्या ऊत्तरात दिले.

 आपल्या आयुष्यावर कोणाचा प्रभाव राहीला,या प्रश्नावर त्यांनी नम्रपणे संत तुकोबाराय आणि साने गुरजी यांचा ऊल्लेख केला.या दोघांच्याही जिवनातील सत्याची मांडणी आणि दिन -दुःखितांची सेवा मला भावली,असे त्यांनी कबुल केले.बहुजन समाजामध्ये अलिकडे जाणीवा आणि अस्मिता निर्माण झाल्या आहेत.परंतु प्रतिभा असुनही या साहित्यिकांना मुख्य प्रवाहातील मिडिया प्रसिद्धी आणि प्लॅटफॉर्म देत नाही.याला थुटे यांनी दुजोरा दिला.सोबतच आपण आपली रेषा मोठी केलीच पाहीजे,असे परखड मत नोंदवले.

 साहित्य आणि पुरस्कारामध्ये ऊचलेगिरी,लॉबींग या वर्तमानातील वास्तवाविषयी भाष्य करतांना हे वाईट असले तरी टाळता येणार नाही.परंतु आपले साहीत्य आणि निर्मिती सकस असेल तर टिकाऊ असेल.त्यामुळे सकस साहित्यनिर्मितीचा आपण ध्यास सतत घेतला पाहीजे.लॉबिंग व ऊचलेगिरीला भविष्य नाही कारण ते तात्कालिक आहे,अशी भुमिका त्यांनी मांडली.शेतकरी, बेरोजगारी,महागाई,सामाजिक विद्वेष आणि शासनाची भुमिका यांवर भाष्य करतांना ; जे काही चालले आहे ते चिंताजनक आहे.परंतु यावर देशातील प्रस्थापित आणि बहुसंख्य साहित्यिक आणि विचारवंतांचे मौन जास्त धोकादायक आहे.असे परखड भाष्य त्यांनी केले.

तुकोबाराय साहित्य परिषद व्दारा आयोजित या मुलाखतीकरीता विभागीय अध्यक्ष पुष्पाताई बोंडे यांनी पुढाकार घेतला.संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर झाडे हे विशेष अतिथी म्हणुन ऊपस्थित होते.संजय कालर यांचे विशेष सहकार्य यासाठी लाभले.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...