Home / चंद्रपूर - जिल्हा / मतदार याद्या अद्ययावत...

चंद्रपूर - जिल्हा

मतदार याद्या अद्ययावत करण्याबाबत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम...!

मतदार याद्या अद्ययावत करण्याबाबत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम...!

मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन

चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 70- राजुरा, 71-चंद्रपूर, 72- बल्लारपूर, 73- ब्रह्मपुरी, 74- चिमूर व 75- वरोरा या सहा विधानसभा मतदार संघातील मतदार याद्यांचा 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारित संक्षिप्त विशेष पुनरिक्षण कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

उपरोक्त कार्यक्रमानुसार दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी संबंधित मतदान केंद्रावर  छायाचित्र मतदार याद्या प्रारूपरीत्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी ज्या पात्र व्यक्तींना दि. 1 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु मतदार यादीत ज्यांचे नाव नाहीत, अशा पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी दि.1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत नजीकच्या मतदान केंद्रावर किंवा संबंधित तहसील कार्यालयात नमुना 6 मधील अर्ज पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्रासह भरून देता येईल. त्याबरोबर ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाही अशा मतदारांकडून रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो प्राप्त करून मतदार यादीत अपलोड करण्यात येणार आहे.

प्रारुप छायाचित्र मतदार यादीत समाविष्ट असलेल्या मतदारांच्या तपशिलात दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली असल्यास, नजीकच्या मतदान केंद्रावर तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊनसुद्धा विहित नमुन्यात अर्ज भरून देता येईल. विहीत नमुन्यातील अर्ज मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात आले असून सदर अर्ज विनामुल्य प्राप्त करून घ्यावे.

सदर मोहीम ही दि. 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत राबविण्यात येत असून या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा. तसेच प्रारूप छायाचित्र मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या मृत, स्थानांतरीत व दुबार मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.

असा आहे पूर्व-पुनरीक्षण उपक्रम व कालावधी

दुबार समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे इत्यादी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या द्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी व पडताळणी, योग्यप्रकारे विभाग, भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे यासाठी दि. 9 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2021 हा कालावधीत निश्चित करण्यात आला आहे.

तर पुनरिक्षण उपक्रम दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, विशेष मोहिमेच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दिवस, दि. 20 डिसेंबर 2021  पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे तर 5 जानेवारी 2020 रोजी  अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.

तरी मतदारांनी छायाचित्र मतदार यादी अद्यावत होण्याच्यादृष्टीने नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांना आवश्यक ते सहकार्य करावे व या संधीचा मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...