Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / सोयाबिन, कापूस उत्पादक...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

सोयाबिन, कापूस उत्पादक शेतक-यांचे आंदोलन पेटविणार -स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतभाऊ तुपकर

सोयाबिन, कापूस उत्पादक शेतक-यांचे आंदोलन पेटविणार -स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतभाऊ तुपकर

सरकारने कोंबड्या जगविणे अनं शेतकरी मारायचा धंदा बंद करावा

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): अतिवृष्टीमुळे कापूस तसेच सोयाबिन उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परीस्थितीत केन्द्र सरकारने कोंबड्यांना खाद्य पुरविण्याच्या नावाखाली सोया पेंड ची आयात केली. यामुळे सोयाबिनचे भाव कोसळले असून केन्द्र सरकारने कोंबड्या जगविण्याचा अनं शेतकरी मारायचा धंदा बंद करावा अशी टिका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतभाऊ तुपकर यांनी केली. विशेष म्हणजे आता न्याय मागण्यांसाठी सोयाबिन, कापूस उत्पादक शेतक-यांचे आंदोलन पेटविणार असल्याचा इशारा सुध्दा त्यांनी दिला आहे. ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते.

विदर्भ तसेच मराठवाड्यातील सोयाबिन तसेच कापूस उत्पादक शेतक-यांचा कुणीही वाली राहीलेला नाही. ज्या पध्दतीने उस उत्पादक शेतकरी तसेच त्या भागातील लोकप्रतिनिधी आपली बाजु मांडून न्याय पदरात पाडून घेतात त्याच पध्दतीने आता सोयाबिन तसेच कापूस उत्पादक शेतक-यांना एकत्रित करुन त्यांच्यासाठी लढा उभारण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतभाऊ तुपकर यांनी नुकताच बुलढाणा येथे मोर्चा काढून या कार्यास प्रारंभ केला. आता यवतमाळ, अमरावती, अकोला, आकोट, परभणी, हिंगोली, नांदेड याठिकाणी बैठक घेऊन मोर्चे बांधणी करण्यात येणार आहे.

वाशिम येथे या मोहिमेचा समारोप होणार असून याच दिवशी दिनांक 12 नोव्हेंबर पासून सुरु होणा-या आंदोलनाची रुपरेशा घोषीत केली जाणार असल्याची माहिती रविकांतभाऊ तुपकर यांनी दिली. शेतक-यांच्या मुलांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या पाठीमागे राहून जिंदाबाद, मुर्दाबाद च्या घोषणा देण्यापेक्षा आपल्या शेतकरी बापाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. सध्या सोयाबिन ला एकरी 25 हजार रुपये खर्च येत आहे. दुसरीकडे सरासरी एकरी चार ते पाच क्विंटल चे उत्पन्न होत असल्याने पाच ते दहा हजार रुपयांचे शेतक-यांचे एकरी नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकविमा कंपण्यांनी तसेच सरकारने तातडीने शेतक-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात 45 लाख हेक्टर वर सोयाबिन चा पेरा होत असतो. 12 लाख हेक्टर वर उसाचा पेरा होतो. असे असतांनाही सोयाबिन शेतकरी सतत नुकसान सहन करीत असल्याने सरकार विरोधात आता जनआंदोलन पेटविणार असल्याचे तुपकर यांनी सांगीतले.

केन्द्र सरकारने 12 लाख मेट्रीक टन सोया पेंड आयात केले. पामतेल तसेच सोया तेलावरील आयात शुक्ल शुन्य करुन टाकले. तेलावर स्टॉक लिमीट लावण्यात आल्याने व्यापा-यांच्या खरेदीला लिमीट लागली आहे. आंतरराष्ट्रीय आयात निर्यातीवर मात्र लिमीट न लावल्याने अंबाणी तसेच अदाणी सारख्यांना रान मोकळे झाले आहे. या धनाढ्य व्यावसाईकांना लाभ मिळवून देण्यासाठीच सोयाबिनच्या किंमती पाडण्याचे षडयंत्र रचल्या गेल्याने सोयाबिन शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्याचे रविकांतभाऊ तुपकर यांनी सांगीतले. सध्या सोयाबिन चे भाव चार हजारावर आल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे राहीलेल्या 4 लाख सोया पेंड ची आयात थांबवा अन्यथा शेतक-यांच्या रोशाला बळी पडाल असा इशारा सुध्दा त्यांनी दिला आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबिन सह कापसाचे प्रचंड नुकसान झाले. सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अजुनही मदत मिळालेली नाही. लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नाही, अशी परीस्थिती आहे. विदर्भातील लोकप्रतिनिधी शेतक-यांना वा-यावर सोडून दुबईचे दौरे करीत आहे. पिकविमा कंपण्यांसोबत हातमिळवणी करुन मलीदा खाल्ला जात आहे. पिकविमा कंपण्यांनी यावर्षी 5 हजार 800 कोटी रुपये जमा करुन फक्त 800 कोटीची नुकसान भरपाई दिली.

विदर्भातील पाच जिल्हयातील 800 शेतक-यांनी गेल्या नऊ महिण्यात आत्महत्या केल्या. त्यामुळे आता आम्ही स्वस्थ बसनार नाही. सोयाबिन तसेच कापूस उत्पादक शेतक-यांची मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे रविकांतभाऊ तुपकर यांनी सांगीतले. पत्रकार परीषदेला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनिषजी जाधव, संतोषराव अरसड, विष्णुजी लांडगे उपस्थित होते.

अन्यथा विज कार्यालय पेटवू

अडचणीत असलेल्या शेतक-यांना कैचीत पकडून त्यांच्या शेतातील मोटरची विज कापण्याचा धंदा विज वितरण कंपणीने सुरु केला आहे. मोठमोठ्या कंपण्यांकडील विज बिल वसुली न करता शेतक-यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास विज वितरण कंपणीचे मुख्य कार्यालय पेटविल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही. विजमंत्र्यांनी त्यांच्या अधिका-यांना आवरायला हवे अन्यथा अदाणी, अंबाणीच्या विमानात फिरणा-यांचा हिशोब आम्हाला करावा लागेल असा इशारा सुध्दा रविकांतभाऊ तुपकर यांनी दिला.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...