Home / महाराष्ट्र / 'सावित्री-ज्योती’ मालिका...

महाराष्ट्र

'सावित्री-ज्योती’ मालिका बंद करण्याचे सोनी मराठी TV चॕनलचे षढयंत्र...?

'सावित्री-ज्योती’ मालिका बंद करण्याचे सोनी मराठी TV चॕनलचे षढयंत्र...?

महाराष्ट्रात TRP घोटाळा

 

संभाजी ब्रिगेड: महाराष्ट्रात TRP घोटाळा करून महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत 'सावित्री-ज्योती’ मालिका २६ डिसेंबर ला बंद पाडली जात आहे हे षढयंत्र आहे. आपण पाहात नसल्यामुळे आणि मालिकेला TRP मिळत नसल्यामुळे बंद होत आहे असे नाही. महाराष्ट्रातसह इतर मराठी बहूल राज्यात सुध्दा मालिका मोठ्या प्रमाणात पाहिली जाते. अभिनेता ओंकार गोवर्धन यांनी साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि अभिनेत्री अश्विनी कासार यांनी साकारलेली सावित्रीबाईं फुलेंची कौतुकास्पद व अभिनंदननीय आहे. मालिकेचे लेखन सुध्दा दर्जेदार आहे. म्हणून संपूर्ण मालिका दाखवली गेली पाहिजे.

सोनी TV चॕनल मधील काही भामटी मंडळी 'सावित्री-ज्योती’ मालिका बंद करण्याच्या मार्गावर आहेत. परंतु महाराष्ट्राला 'सावित्री-ज्योतीरावाच्या विचारांची’ गरज आहे. सोनी मराठी चॕनल २६ डिसेंबर रोजी मालिका बंद करणार आहे. सोनी मराठी चैनल मालिका बंद करण्याचा खोडसाळपणा करत आहे. जर मालिका बंद झाली तर... सोनी मराठी चॕनलवर'चे इतर कोणतेही कार्यक्रमाचे प्रक्षेपण संभाजी ब्रिगेड होऊ देणार नाही. सगळे कार्यक्रम आम्ही उधळून लावू...

लोकांचे प्रबोधन करणारी, सत्यशोधक चळवळ आणि चांगली विचारधारा मजबूत करणारी चांगली मालिकेला आपण प्रतिसाद देत नसल्यामुळे बंद पडत आहे सेक्सी पाळली जात आहे, हे दुर्दैवी आहे. आमच्या लोकांना काय पाहायला आवडतं...? हेच कळायला मार्ग नाही. तुम्ही प्रसिद्धी आणि प्रतिसाद नाही दिला तर चांगल्या कलाकृती निर्माण होणार तरी कशा...!

'सावित्री-ज्योती’ मालिका बंद करण्याचा... हा निर्णय मनाला वेदना देणारा आणि विचारांना तिलांजली देणारा आहे. TRP च्या नादात आम्ही आपलं अस्तित्व विसरत चाललोय.

महाराष्ट्रात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची सोनी मराठी टीव्हीवरील मालिका 26 डिसेंबर नंतर सुद्धा सुरू राहिली पाहिजे. बंद करू नये यासाठी 'महाराष्ट्र सरकार'ने (ठाकरे सरकारने) पुढाकार घ्यावा. सोनी मराठी चॕनल ला कळवावे. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी या विषयावर विशेष लक्ष घालून मालिका चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा... सोनी टीव्हीचे कुठले कार्यक्रम संभाजी ब्रिगेड प्रसिद्ध होऊ देणार नाही. संभाजी ब्रिगेड कार्यालयात घुसून आंदोलन करेल.

वाद मालिकेचा लागत नसून विचारांचा जिवंत ठेवण्यासाठी आहे. आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत. सोनी TV वर 'संभाजी ब्रिगेड' धडकणार...

(याबत उद्या जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व चॕनल यांना भेटून लेखी निवेदन देणार आहोत.)

जय जिजाऊ...! जय ज्योती...!! जय शिवराय...!!

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...