वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जिवती (प्रतिनिधी): अतिदुर्गम आदिवासी मानीकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील गोंदापूर गावाची हकीकत एकीकडे शासन गाव विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी निधी खर्च करित आहे तर दुसरीकडे माञ शासन प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गावात शासकीय योजना पोहोचल्या नाहीत हि शोकांतीका आहे.सद्या चोहीकडे डेंग्यू मलेरियाचे साथीचे प्रमाण जास्त वाढले असल्याचे दिसून येते आहे या प्रसंगी गावातील नागरिकांना नाहक ञास सहन कराव लागत असल्याचा प्रकार बघायला मिळत आहे.
जिवती तालुक्यातील तेलंगनाच्या पूर्वेकडील शेवटच्या टोकावरील हे गाव "गोंदापूर" ग्रामपंचायत भोक्सापूर अंतर्गत येणाऱ्या या गावची स्थापना 1990 ला झालेली असून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी शेती हा आपला परंपारिक व्यवसाय करून आपलं जीवन जगण्यासाठी गेल्या 30 वर्षापासून राहतं आहेत. 20 वस्तीच्या या गावाला शासन आज न उद्या येईल व आपल्याकडे लक्ष देईल व आपल्या गरजा व अपेक्षा पूर्ण करेल या आशेचे किरण घेऊन बसलेल्या या गावाकऱ्यांना गेले 30 वर्ष लोटूनही अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या या गावाचां गेल्या 30 वर्षापासून अपेक्षाचा भंग झाला आहे.या गावात पांदण रस्ता सुद्धा नसल्याने.येण्या जाण्याची साधी सोय सुद्धा नाही.
मानवाची मूलभूत गरज समजली जाणारी पिण्याच्या पाण्याची साधी सोय, वीज कनेक्शन,सुद्धा आजपर्यंत या गावापर्यंत नाही.उन्हाळ्यात ये-जा करण्यासाठी मोटारसायकल जाण्यायेण्यापूरता रस्ता गावकऱ्यांनी श्रमदान करून बनवलेला रस्ता हा सतत संत्ततधार अतिवृष्टी पावसाने पूर्णपणे वाहून गेल्याने आतातरी या गावाचा पूर्णच संपर्क तुटला असल्याने या गावात येण्याजाण्याची तुटकी फुटकी सोय सुद्धा नसल्याने महिलांची दिलिवरी सुद्धा या गावकऱ्याना आपल्या गावातच करावी लागते याचा नाहक त्रास त्यांना नेहमीचाच सहन करावा लागत आहे.ग्रामपंचायतीने तर या गावाला साधा पादंन रस्ता सुद्धा दिलेला नसल्याने नेहमीचच दुर्लक्ष केलेल्या या गावाला पंचायत समितीने सुद्धा कधी लक्ष दिलेल नाही. तसेच शासनाने सुद्धा या गावाची साधी दखल घेतलेली नाही.या गावात साधा पांदंन रस्ता नाही, विज कनेक्शन नाही, हातपंप नाही, अंगणवाडी केंद्र नाही,शाळा नाही,या डिजिटल जगातील मोबाईल ला कव्हरेज सुद्धा नाही.या गावाकडे नेहमीच शासनाच दुर्लक्ष केल्याने चित्र दिसत आहे. अशा गावात आम्ही जगायचं तरी कस हा प्रश्न गावावंशीयांनी उपस्थित केला आहे. गावात आजपर्यंत कोणत्याही शाशकीय योजना पोहचलेल्या नाहीत.त्यामुळे मानवाचे जीवन जणू हे जंगली जनावरा सारखे जगावे लागत असल्याचे गावकरी बोलत आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी लक्ष देऊन जिवती तालुक्यातील मौजा गोंदापुर येथील समस्या निकाली काढावे अन्यथा गोंदापूर गाववासीयांना घेऊन भारतीय स्वराज्य पॅंथर सेना आंदोलन करणार - सय्यद शब्बीर जागीरदार राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय स्वराज्य पॅंथर सेना यांनी वर्तमानपत्र च्या माध्यमातून इशारा दिला आहे
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...