Home / विदर्भ / अकोला / सामाजिक कार्यकर्ता...

विदर्भ    |    अकोला

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांचा सत्कार..!

सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांचा सत्कार..!

अकोला (प्रतिनिधी):  दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 रोजी अकोट येते महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी कॉलेज दर्यापूर रोड अकोट येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन एन.सी.सी. विभाग व रक्ताचं नातं ग्रुप,महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटना अकोला यांच्या वतीने केले होते. सदर रक्तदान शिबिर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ सावळे, जिल्हा उपाध्यक्ष तथा रक्ताचे नातं ग्रृप संस्थापक अध्यक्ष विजय भाऊ गावंडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित केले होते यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे रुग्णांनसाठी झटणारे निस्वार्थी व्यक्तीमत्व, सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक श्रमिक व कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांचा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर सर व सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी रुग्णसेवक श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी भोटकर सर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, सप्तखंजेरीवादक सत्यपाल  महाराज, अकोट शहर चे उपनिरीक्षक पी.एस.आय. राजेश जवसे, अकोट ग्रामीण ठाणेदार नितीन देशमुख, कॅप्टन सुनील डोबाळे, शिवाजी कॉलेज चे प्राचार्य ए.एल. कुलट,  शिवाजी शाळेचे मुख्याध्यापक अतुल म्हैसने, एस. पी. वाघ, एन.सी.सी. प्रमुख श्री पी आर ठाकरे, सरपंच तुषार आढाऊ, अविनाश गावंडे, योगेश लबडे, पत्रकार लोकमत विजय शिंदे, कमलेश राठी, नरेंद्र कोंडे, देवानंद खिरकर, पवन बेलसरे, शेखर बेंडवाल महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा सचिव सतिश भाऊ तेलगोटे  मान्यवर उपस्थित होते.यावेळी रक्त संकलित करायसाठी सरकारी रुग्णालयातील रक्तपेढी अकोला उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रवीण बोंद्रे यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता विजय गावंडे, यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...