Home / महाराष्ट्र / तर...परत मनुस्मृती जीवंत...

महाराष्ट्र

तर...परत मनुस्मृती जीवंत करुन समाजाला गुलामीच्या खाईत लोटणारे करंटे आपणच असू

तर...परत मनुस्मृती जीवंत करुन समाजाला गुलामीच्या खाईत लोटणारे करंटे आपणच असू

२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस

 


 रामचंद्र सालेकर (भारतीय वार्ता ): २५ डिसेंबर १९२७ हा दिवस देशभर मनुस्मृती दहन दिन म्हणून पाळल्या जातो. मानव जातीला शाप असलेलं मानसाला पशुप्रमाने गुलाम तयार करणारं मनुस्मृती नावाचं हे पुस्तक डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी याच दिवशी दहन करुन या पुस्तकात लिहील्या गेलेल्या व त्यानुसार चालत आलेल्या भारतीय समाजातील अनेक विकृत अत्याचारी चालीरीती, स्त्री दास्यत्व, शुद्रादिशुद्र,मानसामानसात भेदाभेद, छुवाछुत, अंधश्रद्धा या समाजविकृतीला तिलांजली दिली.
    परंतु आजही मनुचे वंशज ही मनुस्मृती जीवंत ठेवू पहात आहे एवढेच नव्हे तर ती परत या भारतीय समाजावर थोपवून परत या भारतीयांना हे विदेशी गुलाम करु पहात आहे. याचे पाळेमुळे आजही या भारतभूमीत जीवंत आहे. या मनुस्मृतीचे  पाळेमुळे मुळासकट खनून काढण्याची जबाबदारी  आता मनुस्मृतीने या देशातल्या खऱ्या भारतीयांना शुद्र ,अतीशुद्र ठरवलेल्या बहुजन समाजाची आहे. (Who were the Shudras?) पूर्वी शुद्र कोण होते? ह्या डाॕ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत ग्रंथाचा अभ्यास प्रत्येक ओबीसीं मराठ्यांनी करणे आवश्यक आहे? याचे  खरे कारण या मनुस्मृतीची पाळेमुळे या देशात जिवंत असण्याचं मुळ कारण ओबीसी मराठ्यांना ते शुद्र असल्याची जाणीव झालेली नसने हे आहे. ओबीसी मराठ्यांनो तुम्हाला फक्त वेशीच्या आत ठेवले म्हणून हुरळून जावू नका ब्राम्हणांसाठी तुम्ही शुद्रच आहात.फक्त तुम्हच्याकडून सेवा करुन घ्यायसाठी तुम्हाला जवळ ठेवले. तुम्हचा स्पर्श स्पृष्य मानला कारण त्यांना  जगायसाठी कुणब्याशिवाय अन्न पाणी मिळणार नव्हते, गवंड्याशिवाय रहायला घर मिळणार नव्हते, गवळ्याशिवाय दुध तुप लोणी खायला मिळणार नव्हते, तेल्याशिवाय तेल मिळणार नव्हते, माळ्याशिवाय भाजीपाला मिळणार नव्हता, सुताराशिवाय झोपायला पलंग मिळणार नव्हता, शिंप्याशिवाय अंगावर कपडे घालायला मिळणार नव्हते, कुंभाराशिवाय थंड पाणी पिण्यासाठी माठ मिळणार नव्हता,सोनाराशिवाय अलंकार मिळणार नव्हते,...म्हणून आपल्याला वेशीच्या आत ठेवले. अंगनात एवढच नव्हे तर घरात प्रवेश देणे त्यांना भाग पडले. परंतु त्यांच्यासाठी आपण सगळे  शुद्रच, ब्राम्हणाकडून कोणीही आपली कुंडली काढून घ्या, आपला वर्ण शुद्रच कुंडलीत दाखवला असणार हे पक्के. छ.शिवरायांना शुद्र असल्याचे कारण देवून राजा होण्यापासून रोखल्याचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. आपण अती शुद्र नाही,आपल्या स्पर्शाने ते बाटत नाही एवढयातच ओबीसी मराठ्यांनी हुरळून जावू नये, परंतु त्यांचे देव मात्र आजही बाटत आहे.  यादव नावाच्या मराठा मोलकरीनने खोले नावाच्या ब्राम्हणींचे  देव बाटवल्याची पोलीसात तक्रार दिलीच की. तरी आपल्याला हे शुद्र मानतात हे आपण समजू शकत नसू तर आजही आपण किती गुलाम आहो हे लक्षात येते. अती शुद्रांच काम त्यांना महिण्या वर्षातून एखाद्या वेळेस पडायच तेही दुरुनच म्हणून त्यांना वेशीच्या बाहेर ठेवले कारण चप्पल एकदा घेतली की वर्षभर चांभाराच काम त्यांना पडत नसे,एखाद्या वेळेस जनावर मरायच त्यामुळे महार मांगाच काम त्यांना पडत नसे.त्यामुळे त्यांना वेशीच्या बाहेर ठेवले. यांच्या निसर्ग विध्वसंक पितृसत्ताक यज्ञ संस्कृतीला विरोध करणारे निसर्गपुजक मातृसत्ताक सिंधु संस्कृती चे या देशातील आदिवासी यांना जंगलात पिटाळुन लावले. परंतु आपण सर्व एससी एसटी ओबीसी मराठा व्हिजे एनटी शुद्रच हे आपण जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला मनुस्मृतीचं हे जळ घट्ट चिकटलेले असणार. हेच आपल्या गुलामीचं आणि अधोगतीचं खर कारण आहे हे आपण लक्षात असू द्यावं अन्यथा डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या मनुस्मृती चे दहन करुन आपली संपवलेली गुलामी परत मनुस्मृती जीवंत करुन समाजाला गुलाम करणारे करंटे आपणच असू हे ध्यानात ठेवा.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...