Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / पेट्रोल डिझेल दरवाढ...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

पेट्रोल डिझेल दरवाढ व महागाई विरोधात वणी तालुका युवक काँग्रेस कमिटी च स्वाक्षरी आंदोलन.

पेट्रोल डिझेल दरवाढ व महागाई विरोधात वणी तालुका युवक काँग्रेस कमिटी च स्वाक्षरी आंदोलन.

वणी (प्रतिनिधी ) : " मरणे झाले स्वस्त, पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे जगणे झाले महाग, अपयशी मोदी सरकार जनतेवर करीत आहे अत्याचार" असे सांगत पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या महागाई विरोधात स्वाक्षरी घेऊन लाठावाला पेट्रोल पंपावर अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. पेट्रोल डिझेलची दरवाढ ही प्रत्येकाला चटके देत आहे. कोरोना काळात नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले व्यवसाय बंद पडले अश्या अवस्थेतही मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोज चालू ठेवली आहे. त्यामुळे एकार्थे जनतेवरती मोदी सरकार करत असलेला अत्याचारच  आहे. संकट काळात जनतेला दिलासा देण्याच्या ऐवजी दरवाढ करून ते जनतेला अधिक अडचणीत व दुःखात ढकलत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी आज स्वाक्षरी मोहीम व  तीव्र आक्रोश आंदोलन केले. झोपलेल्या जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्या जागे करता येत नाही सर्व जनता आता जागरूक झाली असून झोपेचे सोंग घेतलेल्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली आणल्याशिवाय जनता राहणार नाही. महागाई व पेट्रोल डिझेलचे दर कमी होत नाही तो पर्यंत काँग्रेस पक्ष मा. सोनियाजी गांधी, मा. राहुल गांधी व मा. नाना पाटोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत राहील.लाठीवाला पेट्रोल येथे पेट्रोल भबरण्यासाठी आलेल्या नागरीकांनी स्वाक्षरी देऊन निषेध नोंदविला. यावेळी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक नागभिडकर,तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहर प्रमुख प्रमोद निकुरे, वणी विधानसभा उपाध्यक्ष सचिन टाले,सो.मिडीया प्रमुख प्रदीप खेकारे, शाहीद खान, सुधीर खंडाळकर, प्रमोद ठाकरे, गौरव कुमरे, तनिश खैरे, प्रमोद नित, गणेश अर्के,नागेश डंभारे,वणी तालुका युवक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण 05 February, 2025

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...

वणीतील बातम्या

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...