Home / महाराष्ट्र / शिवराय ते भिमराव यांच्या...

महाराष्ट्र

शिवराय ते भिमराव यांच्या विचार- कार्याची साखळी 

शिवराय ते भिमराव यांच्या विचार- कार्याची साखळी 

फुले-आंबेडकर जनमोत्सव निमित्त
           

 अनिल भुसारी, तुमसर:  आम्हाला समता व न्यायधिष्ठीत राष्ट्र निर्माण करायचा असेल तर शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर यांनी जी विचारधारा सांगितली आहे त्या विचारधारेचा अवलंब केल्याशिवाय पर्याय नाही.  बुद्धाने जगाचे दुःख नष्ट करण्यासाठी राजपाटाचा त्याग केला आणि ज्ञान प्राप्त करून 'कार्यकारणभावाचा सिद्धांत' मांडला व त्याच विचारांचा स्विकार राजपाट करणाऱ्या सम्राट अशोकाने केला आणि फक्त भारतातच नव्हे तर जवळपास आशियाखंड धम्ममय केला. नंतर मध्ययुगीन काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळातील बलाढ्य मोगलशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व त्याचबरोबर स्वराज्य स्थापन करण्याला विरोध करणाऱ्या  स्वकीयांचा आपल्या गनिमी काव्याने परास्त करून स्वराज्याची स्थापना केली आणि शेतकरी -कष्टकरी, महिला, दिन दलित, सर्वसामान्य जनतेला सुखी केले. छत्रपती शिवरायांच्या शिवनीतीचा वापर करून महात्मा जोतीराव फुलेंनी दिन- दलित श्रमकरी, महिला बहुजनांच्या न्याय हक्काचा लढा उभारला आणि तो यशस्वी केला. या लढ्याला संस्थात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न  आपल्या कार्य व  लेखणीने करून 'सत्यशोक समाजाची 'स्थापना केली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या आयुष्यात जेव्हा वेदोक्त प्रकरण निर्माण झाले; तेव्हा शाहू महाराजांना जाणीव झाली की, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने शूद्र म्हणून उल्लेख करून रयतेचे कल्याण करणाऱ्या राजाच्या  राज्यभिषेकाला विरोध केला तेव्हा हे आपल्याला कसे स्वीकारणार. तिथून महाराजांचे डोळे खाडकन उघडले. वेदोक्त प्रकरणाने आम्हाला खरा शिवरायांचा वैचारिक वारसदार मिळाला. नंतर शाहू महाराजांने  महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सत्यशोधकी विचाराचा फक्त स्वीकारच केला नाही तर शिवराय व जोतीराव यांच्या विचाराने राजपाट चालविला. फुलेंनी आरक्षणाची भूमिका मांडली व शाहू महाराजांनी ती राबविली. शाहू महाराज जिवंत असे पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले.  परंतु दुर्दैवाने शाहू महाराज अल्पायुषी ठरले. शाहू महाराज निदान 1935 पर्यंत जगले असते तर महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे मराठा - ओबीसी समाज भक्कमपणे उभा केला असता. बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व बहुजन महामानवाचा विचार स्वीकारलाच नाही तर त्यांच्या समता, स्वतःत्रय, बंधुता, न्याय या विचारांना घटनात्मक स्वरूप देण्याचे कार्य केले. त्याच राज्यघटनेनुसार 1950 ते आजतागायत सर्व पक्ष शासन करत आहेत; परंतु जेव्ह आम्ही राज्यघटनेतील कलमांचा व मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करतो तेव्हा मात्र शासनकर्त्यांनी आम्हा भारतीयांना निराश केल्याचे दिसते. 
       जर राज्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे घटनेनुसार राज्यकारभार केला असता तर आज आमच्या शेतकऱ्यांवर कामगारांवर आत्महत्या करण्याचे प्रसंग आले नसते. शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती. प्रशासनातील आम्हा बहुजनांच्या (मराठा, ओबीसी, एस.सी., एस.टी. ) मोक्याच्या जागा रिक्त राहिल्या नसत्या. देश आज 100% साक्षर असता. महिलांचा हुंड्यामुळे किंवा विनयभंगामुळे जिव गेला नसता. महिलेची रांझाच्या पाटलाने आब्रू लुटण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी पाटलाचे हात कलम केले. त्यानंतर स्वराज्यात आया -बहिणीकडे नजर वर करून पाहण्याची कुणाची हिम्मत  झाली नाही. आज दिवसाढवळ्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गैरवर्तन चुकीमुळे महिला अधिकाऱ्यांवर आत्महत्या कराव्या लागत आहे. ही लोकशाही शासन व्यवस्थेची शोकांतिका आहे. शेवटी  सर्वात महत्वाचे म्हणजे महासत्ता बनण्याच्या नादात शिक्षण आणि आरोग्याकडे सरकारने किती दुर्लक्ष केल आहे हे कोरोनाने समोर आणलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे आम्ही आरोग्याच्या सोयी-सुविधामध्ये किती पाण्यात आहोत हे दिसत आहे. वर्षभरानंतर सुद्धा आम्ही आरोग्याच्या बाबतीत परिपूर्ण सुविधा उभारण्यात अपयशी ठरलो आहोत. वर्षभर आम्ही मंदीर सुरू करण्याकरिता आंदोलन केले. मंदिरा करिता पैसा उभारण्यात व्यस्त होतो. बंद असलेल्या शाळा, दवाखान्यात असणाऱ्या सुविधांची कमतरता आम्हाला दिसत नाही. शासनाने तर थाळ्या आणि टाळ्या वाजविण्याची वेळ आमच्यावर आणूनपाडली आहे. फुले -आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने इथून पुढे भारतानेच नव्हे तर जगाने जीवघेणारा शस्त्र साठा आणि गरज नसणाऱ्या मेट्रो वर पैसा आणि वेळ खर्च करण्यापेक्षा मानवी जिव वाचविणारे साधन निर्माण करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जगातील सर्वसामान्य माणसाची तिच इच्छा आहे... 
 

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...