Home / महाराष्ट्र / शहरातील मुख्य चौकात...

महाराष्ट्र

शहरातील मुख्य चौकात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्साहात साजरी..

शहरातील मुख्य चौकात ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती उत्साहात साजरी..

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त शिवतीर्थ वर उसळला तरुणाईचा जल्लोष.. 

वणी:  शहरातील मुख्य टिळक चौक येथील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर , आज १९ फेब्रुवारी ला सकाळी ९ ते ११ वाजता सुमारास अखंड  हिंदुस्थान चे आराध्य दैवत श्री.  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भगवा ढोल ताशा व झांझ पथक यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी संपुर्ण परिसर हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या, घोषणेने गजरुन गेला होता. यावेळी या भगवा ढोल ताशा ध्वज आणी झांझ पथकामध्ये मोठ्या प्रमाणात युवक-युवतींनी मोठ्या उत्साहात सहभाग दर्शविला होता. या पथकामध्ये ,२५ ढोल तर १० ताशे असा एकुण संच सहभागी झाला होता. आणी मोठ मोठ्या शिवाजी महाराजांच्या पताकांनी ,शिवाजी महाराज जयंती ,उत्साहात साजरी करण्यात आली.

 

 

शिवतीर्थ वर उसळला तरुणाईचा जल्लोष:

या निमीत्ताने  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकाळी शिवतीर्थ वर शिवजन्मोत्सव युवा समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णकृती पुतळ्याचे समितीचे अध्यक्ष अजिंक्य शेंडे यांचे उपस्थितीत पुजन, हारार्पण करून भव्य भगवा ढोल पथक वाजवून शंख नाद करण्यात आला. यावेळी हा भव्य सोहळा पाहण्यासाठी शिवप्रेमी बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती.

कोरोनाचा वाढता प्रभाव व जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे नियमांचे काटेकोरपणे पालन करत सायंकाळ ची जंगी मिरवणूक रद्द करून शिवजन्मोत्सव युवा समितीचे पदाधिकार्यांनी शिवतीर्थवर महाराज्यांची जयंती साजरी केली.

यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी अजिंक्य शेंडे ,मिलिंद बावणे,ललित लांजेवार,ध्रुव येरणे,प्रियुश चव्हाण सौरभ वानखेडे, अजय कुमरे हर्षद मुसळे ,सचेत पावडे, राजु धोबे,विशाल घाटोळे, संकेत ठाकरे,गौरव देशमुख,मंगेश काकडे, श्रेयस माळिकर,सतीश खोंडे, सौरभ बोडे, सुमित चौधरी,हितेश गोडे, योगेश आवारी व अनेक शिवप्रेमी युवक उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...