खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
राजू गोरे (शिंदोला): गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या सिंदोला ते कळमना राज्य मार्गाची अतिशय दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यांमध्ये रस्ता अशी अवस्था रस्त्याची झालेली आहे। अनेकदा मागणी करून सुद्धा , सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलले नाही । यामुळे या मार्गावर अपघात नित्याचेच झाले असून त्यामध्ये अनेकदा जीवित हानी होऊन अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. रस्त्यातून वाहने चालवणे कठीण झाले असून वाहने सुद्धा खिळखिळी झाली आहेत.
पायी चालणाऱ्या माणसालासुद्धा रस्त्यात चालणे म्हणजे स्वर्गात जाण्यासारखे वाटते। ह्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, या समस्येचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याकरिता ,श्री संजयजी निखाडे पंचायत समिती सदस्य यांच्या नेतृत्वाखाली पाथरी परमडोह फाट्यावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनामध्ये मधुकर वाभिटकर सरपंच परमडोह, संदीप थेरे, सुरेश काकडे ,धीरज बोर्डे, रवी बदखल सरपंच पारडी ,शांताराम राजूरकर सरपंच कळमना ,संगीता झाडे सरपंच चनाखा,अनिकेत बोरडे, मयूर बोबडे ,अनिकेत बांदूरकर, जीवन बोर्डे, प्रफुल्ल मुसळे,सुरेश बोर्डे व परिसरातील शेकडो नागरिक रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आंदोलनाचे दरम्यान वनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता तुषार परळीकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। आणि या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर असून। कामाची निविदा काढण्यात आलेले आहे । निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून एक महिन्याच्या आत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले। परिसरातील जनतेची आता एक मुखाने मागणी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन रस्त्यामुळे भविष्यात त्रास होणार नाही अशी जनतेला आशा आहे।
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...