श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
वणी (दि : ६) : वणी तालुक्यातून होणारी दारू तस्करी, अवैध दारू विक्री त्यांच्यावर कार्यवाही करण्याकरिता तालुक्यात विशेष पोलिस पथक तयार करण्यात आलं आहे. या विशेष पोलिस पथकाने दि.४ जूनला रात्री १०.३० वाजता चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारूची तस्करी उघडकीस आणली असुन वणी मध्ये शहरातून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या बुलेरो वाहनासह दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दारू तस्करी वरील धाडीत पोलिसांनी तब्बल १० लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशेष पोलीस पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांना चारगाव चौकी मार्गे दारू दारूबंदी जिल्ह्यात अवैधरित्या देशी दारू विक्री करिता नेण्यात येणार असल्याच्या माहिती वरून पोलिसांनी चारगाव चौकी येथे सापळा रचून रात्री १०.४० वाजता वणी कडून घुग्गुसकडे जाणाऱ्या बुलेरो वाहनाला थांबवून वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूचे बॉक्स आढळून आले. १८० मिली देशी दारूच्या शिशांचे ७० बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये ४८ नग, एक पवा ६० रुपये किमतीचे ३३६० नग किंमत २ लाख १ हजार ६०० रुपये, ९० मिली चे २०० बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये १०० शिश्या, एकूण ३० रुपये किमतीचे २० हजार नग किंमत ६ लाख रुपये, बुलेरो वाहन क्रं एम एच २९ बी ई ०१७९ किंमत २ लाख ५० हजार रुपये, एक स्मार्ट फोन किंमत ५ हजार रुपये, एक साधा फोन किंमत १ हजार रुपये असा एकूण १० लाख ५७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी हरीश पुरुषोत्तम तिरणकर (२२) रा. कोरंबी (मारेगाव) व नंदेश्वर तात्याजी काळे (२७) रा. जगदंबा देवस्थान गणेशपूर ता. वणी यांना अटक केली आहे. त्यांच्यावर म. दा. का. च्या कलम ६५ (अ) (ई), सहकलम १३० (१), १७७ मो.वा. का. नुसार गुन्हा दाखल केला केला आहे. ह्या कार्यवाही ने ए पी आय मुकुंद कवाडे याच्या ढाळ सत्राने वणी उपविभातील ठाणेदार यांच्यात भीती निर्माण झाली असून कोणत्या ठाणेदार यांना पोलीस अधीक्षक घरी बसवतील हा नेम आता समोर येणार आहे. त्यामुळे कोटी रुपयाच्या माया जाळातील वर कमाईला पाठराखण करणार की प्रशासना सोबत हात मिळवणी करणार हे यनाऱ्या काळात स्पष्ट होतील असे बोलें जात आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...