Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / शिरपुर पोलीस स्टेशन...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

शिरपुर पोलीस स्टेशन पोलीसांची केबलतार व भंगार चोरी करणा-या आरोपींविरूध धडक कार्यवाही..!

शिरपुर पोलीस स्टेशन पोलीसांची केबलतार व भंगार चोरी करणा-या आरोपींविरूध धडक कार्यवाही..!

शिरपूर पोलीस स्टेशन ची यशस्वी कामगिरी

शिरपूर(प्रतिनिधी): अलीकडील काळात पोलीस ठाणे शिरपुर हद्यीत बंद असलेले कारखाने व इतर निर्मनुष्य ठिकाणी केबलतार च भंगार चोरीच्या गुन्हयात झालेली वाढ पाहता शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी गुन्हे प्रतिबंध व आरोपी अटक करणेबाबत विशेष मोहीम राबविणेबाबत आदेश निर्गमीत करून विविध तिन पथके तयार केली त्यामध्ये पोलीस स्टेशन परिसरातील तिन गुन्हयांचा उलघडा करण्यात यश मिळविले असुन त्यामध्ये खालील प्रमाणे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत.

१) अक्षय व्यंकटी तलांडे वय २५ वर्ष रा. घुग्गुस जि. चंद्रपुर , २) आकाश मल्हारी भगत वय २९ वर्ष रा. घुग्गुस जि. चंद्रपुर, ३)प्रफुल दिपक गीरी वय २२ वर्ष रा. घुग्गुस , ४) सुखदेव केशव झाडे वय २१ वर्ष रा. शिंदोला, ५) राजेश मारोती खदरे वय २८ वर्ष रा. दहीफळ ता. नेर. 
६) श्रीकांत सुरेश आगदरी, वय २८, रा.घुग्गुस ७) नासिफ निजामुद्दीत, शेख, वय ३१, रा.श्रीरामवार्ड घुग्गुस, ८) महेश वासुदेव दुर्गे, वय २२, रा. घुग्गुस असे आरोपी अटक करण्यात आलेले.

त्यांचेकडुन गुन्हयातील चोरी गेलेला मुद्येमाल व गुन्हयात वापरण्यात आलेले वाहने असा एकुण २ लक्ष १७ हजार ३०० रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर गुन्हयांचा सखोल तपास सुरू आहे. सदर प्रकरणाचे तपासात पोलीसांनी तांत्रीक व पारंपारीक पध्दतीचा उपयोग करून तिनही गुन्हयातील आरोपीतांचा शोध लावुन सदर गुन्हयात अद्यापावेतो एकुण ८ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले. 

शिरपुर पोलीसांच्या वतीने जनतेला आवाहन करण्यात येते की, त्यांनी बाहेरगावी जातेवेळी मौल्यवान वस्तु अगर रोख रक्कम घरी ठेवु नये त्याचप्रमाणे बंद असलेली कारखाने व इतर आस्थापने याठिकाणी वैयक्तीक सुरक्षा रक्षकांची नेमणुक करून सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. श्री. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधिक्षक डॉ. श्री.खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय पुजलवार यांचे मार्गदर्शणात शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सचिन लुले, पोउपनि राम कांडुरे, प्रमोद जुनुनकर, गुनवंत पाटील, अनिल सुरपाम, विनोद मोतेराव, अंकुश कोहचाडे, गजानन सावसाकडे यांनी पार पाडली आहे.
 

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...