वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
संमतीपत्र देण्यास मात्र अमान्य
नववी ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरू होणार असून या निर्णयाबाबत पालक अद्यापही संभ्रमात असल्याचे सर्वेक्षणावरून दिसत आहे, मात्र शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठवण्याचीही पालकांची तयारी आहे.ग्रामीण भागातुन स्वतःच्या वाहनाने अशक्य, ऑनलाईन व एनीमेट पर्याय हाच योग्य निर्णय.
राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. मुलांना शाळेत पाठवताना पालकांचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे काय, असा प्रश्न पालकांना सतावत आहे. तर दुसरीकडे लस आल्याशिवाय प्रत्यक्ष वर्ग सुरू करू नयेत असाही मतप्रवाह पालकांमध्ये आहे. शाळा सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनीही पालकांना त्यांचे मत व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी पालकांची मते सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणूून घेतली आहेत. गुगल अर्जाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पालकांनी मत नोंदवले आहे.हे शक्य मग शाळा का?
ऑनलाइन शिक्षणाबाबत समाधान, पण..
गेले सहा महिने सुरू असलेल्या ऑनलाइन वर्गाबाबतचा अनुभव साधारण असल्याचे ४०.५ टक्के पालकांचे म्हणणे आहे, तर हा अनुभव चांगला असल्याचे ३३.१ टक्के पालकांनी नमूद केले आहे. हा अनुभव अतिशय चांगला असल्याचे मत मात्र १३.९ टक्के पालकांनी नमूद केले आहे. येत्या काळात प्रत्यक्ष वर्गाची जागा ऑनलाइन शिक्षण घेऊ शकणार नाही, असे पालकांना वाटत असून हा पर्याय निवडणाऱ्या पालकांचे प्रमाण ६३.२ टक्के आहे. पालकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी महिन्याला साधारण ५०० रु. खर्च येत असल्याचे ५८.७ टक्के पालकांनी म्हटले आहे, तर २००० किंवा त्यापेक्षा अधिक रुपये खर्च करणाऱ्या पालकांचे प्रमाण ४ टक्के आहे.
म्हणणे काय?
* शाळा सुरू करण्याचा निर्णय योग्य असल्याचे ४६.६ टक्के पालकांचे म्हणणे आहे. निर्णय अयोग्य असल्याचे २६.९ टक्के पालकांचे म्हणणे आहे, तर सांगता येत नाही असे २६.२ टक्के पालकांनी नमूद केले आहे. शाळा सुरू करण्यासाठी ५० टक्क्यांहून अधिक पालकांनी होकार दर्शवला नसला तरी शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत संमतीपत्र देण्याची तयारी आहे.
* शाळेत जाण्यासाठी लेखी परवानगी देण्याची ५७ टक्के पालकांची तयारी आहे, तर ४३ टक्के पालकांची परवानगी पत्र देण्याची तयारी नाही. घोळक्यात करोना संसर्ग होण्याची भीती असल्यामुळे शाळेत पाठवण्याची तयारी नसल्याचे २६.३ टक्के पालकांचे म्हणणे आहे, तर शाळेला निर्जंतुकीकरण शक्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास भीती वाटत असल्याचे २२.२ टक्के पालकांचे म्हणणे आहे.हे सर्व संभ्रमात चालू आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...