आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
भद्रावती: संपूर्ण जगात कोरोनाची लाट असताना चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांसाठी एक मदतीचा हात म्हणून दुबईस्थित भद्रावतीच्या सुपुत्राने अडीच लाखाचे दान दिल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जोएल दिलीप देवधरे असे त्या दुबईस्थित दानी सुपुत्राचे नाव आहे. ते मूळचे भद्रावतीचे आहेत. त्यांचे वडील दिलीप देवधरे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. ते मागील तीन वर्षांपासून दुबई येथे आय. टी. अभियंता म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण जगभरात चाललेल्या महामारीच्या संकटात आपल्या मूळ जिल्ह्याची परिस्थिती पाहुन जोएल यांच्या मनाला वेदना होत होत्या. त्यामुळे आपण कोरोना रुग्णांसाठी काहीतरी मदतीचा हात दिला पाहिजे हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. त्यांनी चंद्रपूर येथील रामनगर येथे कोविड रुग्णालयात नोडल अधिकारी असलेले त्यांचे डाॅक्टर मामा बंडू रामटेके यांना हा विचार दाखवला. त्यांनी त्यांना सहमती दर्शविली. त्यामुळे देवधरे यांनी या कोविड रुग्णालयाला अडीच लाखांची देणगी दिली.
या रकमेतून अत्यंत निकडीच्या वेळी व्हेंटीलेटरला लागणारे साहित्य, आॅक्सिजन देण्यासाठी आवश्यक मास्क, अतिदक्षता विभागात लागणारे अत्यावश्यक साहित्य, महत्त्वाचे औषधोपचार इत्यादींवर खर्च करण्यात आला. मात्र हे दान देताना देवधरे यांनी कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धी केली नाही. नव्हे, दान देताना कोणताही गाजावाजा होणार नाही ही त्यांची अट होती. देवधरे यांचे जिल्ह्याप्रती असलेले प्रेम, आपुलकी, जाणिव, भावना आणि आपण समाजाला काही देणे लागतो ही वृत्ती यामुळे कौतुकाचे चार शब्द पुढे आलेत. वडील दिलीप देवधरे आणि आई शोभा देवधरे यांच्या संस्कारातून जोएल यांची परोपकारी घडण झाली. परिसराशी नाळ जुळली. म्हणूनच दुबईस्थित असुनही जोएलने आपल्या जिल्हयाकरीता दिलेले दान फार महत्वाचे ठरले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...