वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आयोजन
चंद्रपूर दि.16: पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थती लक्षात घेता नागरीकांचा बचाव व त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या दृष्टीने नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्यावतीने (एसडीआरएफ) प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेचे आयोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे करण्यात आले होते.
नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, एसडीआरएफचे पोलिस उपअधिक्षक सुरेश कराळे, पोलिस उपनिरीक्षक अजय काळसरपे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना श्री गव्हाड म्हणाले, जिल्ह्यातील जवळपास 86 गावे पूरप्रवण क्षेत्रात असून पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक महत्वाचे आहे. या प्रशिक्षणातील माहिती आपापल्या तालुक्यातील इतरांना देण्यासाठी अतिशय गांभिर्याने प्रशिक्षण शिकून घ्या. तसेच ज्या गावांमध्ये पूर परिस्थिती येण्याची शक्यता असते तेथील किमान 10-15 नागरिकांचे संपर्क क्रमांक जवळ असणे आवश्यक आहे. त्यामुळे नेटवर्कची समस्या उद्भवणार नाही. पूर परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी एसडीआरएफचे उपअधिक्षक श्री. कराळे म्हणाले, पूर परिस्थितीत नागरीक घाबरलेले असतात. त्यामुळे त्यांना धीर देणे आवश्यक आहे. आम्ही तुमच्या मदतीला आलो आहोत, असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा. पूरपिडीत गावातील सरपंच, पोलिस पाटील व इतरही नागरिकांना सोबत घेऊन मदतकार्य सूरू करावे. जेणेकरून स्थानिक परिस्थितीची त्यांना चांगली कल्पना असल्यामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होणार नाही. संपर्क यंत्रणा मजबूत असणे गरजेचे आहे. एखाद्याने मदतीची याचना केली तर कोणताही विलंब न करता त्या परिस्थितीतून संबंधितांना बाहेर काढणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पूर परिस्थिती हाताळतांना मास्कचा वापर, सॅनिटायझर आदींचा उपयोग करावा. आपात्कालीन किटमध्ये टार्च, बॅटरीवर चालणारे वॉकीटॉकी, खाद्यसामुग्री, प्रथमोपचार किट आदी बाबी सोबत असाव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्यासह पोलिस आणि महसूल विभागाचे कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील आपत्ती व्यवस्थापनांतर्गत काम करणा-या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...