Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / मोबाईल नंबर न दिल्याने...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

मोबाईल नंबर न दिल्याने शाळकरी मुलीचा विनयभंग..

मोबाईल नंबर न दिल्याने शाळकरी मुलीचा विनयभंग..
ads images
ads images

 मजनूची भररस्त्यात पीडितेला मारहाण, विठ्ठलवाडी, वणी येथील घटना

Advertisement

आशिष साबरे (वणी विभागीय प्रतिनिधी) : शाळकरी मुलीने मोबाईल नंबर न दिल्याने एका मजनुने तिचा विनयभंग केला. काल बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ट्युशन क्लास करून घरी परत जात असताना शहरातील वरोरा रोडवर ही घटना घडली. या मजनुने पीडितेला भर रस्त्यात मारहाणही केली.पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलीस स्टेशन येथे आरोपीविरोधात पोस्कोसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पीडित मुलगी ही इयत्ता १० व्या वर्गात शिक्षण घेत आहे.ती सकाळी १० वाजता ट्युशन साठी जात होती व ११ वाजता परत येत होती.४ जुलै रोजी ती ट्युशन संपल्यावर घरी परत जात असताना विठ्ठलवाडी मध्ये एका अनोळखी मुलाने तिला रस्त्यात थांबवून तिचा मोबाईल नंबर मागितला होता. यावर पीडितेने लक्ष दिले नाही व ती तिथून निघून गेली.

त्यानंतर सदर आरोपी तिचा ३ दिवसांपासून पाठलाग करीत होता.काल बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ती पीडित मुलगी ट्युशनहुन वर्ग मैत्रीनी सोबत येत होती. यादरम्यान तीच आरोपी मुलगा दुचाकीवरून आला व त्याने पीडितेला मोबाईल नंबर का देत नाही? म्हणून ऊन्ह विचारले.

एवढ्यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने पीडितेचे केस पकडून तिला रस्त्यावरच मारहाण केली. तसेच आताही जर मोबाईल नंबर दिला नाही तर पुन्हा मारणार अशी धमकीही त्याने पीडित मुलीला दिली. सदर घटनेने पीडित मुलगी खूप घाबरली. सदर आरोपी मुलाबाबत माहिती काढली असता त्याचे नाव शीव शेंगर (वय २०) रा. रंगनाथ नगर,वणी असल्याची माहिती पीडित मुलीला मिळाली.

याबाबत मुलीने कुटुंबियांना माहिती दिली असता पीडितेच्या कुटुंबीयांनी वणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून आरोपी शीव शेंगर विरुद्ध कलम ३५४ ड (१) ३२३,५०६ सहकलम १२ बाललैंगिक संरक्षण अधिनियम २०१२ (पोस्को) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय माया चाटसे करीत आहे.

ताज्या बातम्या

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 18 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची  मागणी  :अन्यथा आंदोलन करणार 18 September, 2024

शिरपूर गावातील बसस्थानकावर गतिरोधक बसवण्याची मनसेची मागणी :अन्यथा आंदोलन करणार

वणी:- वणी तालुक्यातील शिरपूर ते कोरपणा मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची दळणवळण सुरू असते. प्रवासी, गावकरी...

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन. 18 September, 2024

विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे वणीत आयोजन, २० सप्टेंबरला उद्घाटन.

वणी :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण...

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी. 17 September, 2024

वणी विभागात होत असलेले अवैद्य उत्खनन, वाहतूक व तस्करी तात्काळ थांबवा, अन्यथा आंदोलन -संभाजी ब्रिगेड ची उपविभागीय अधिकारी यांचेकडे मागणी.

वणी :- मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन करून त्यांची अवैध विक्री करणारे रॅकेट परिसरात सज्ज असल्याचे दिसून येत आहे. मुरुम...

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न. 17 September, 2024

राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस संपन्न.

वणी- येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात हिंदी दिवस साजरा करण्यात आला.यानिमीत्याने विद्यार्थ्यासाठी कवितापठन,भाषणस्पर्धा,रांगोळी...

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू. 17 September, 2024

अर्ध्या रात्री मद्यधुंद चालकाचा राडा, वाहतूक पोलिसांवर उगारले चाकू.

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौकात रेल्वे गेट 39 वर रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य शुरु असल्याने एकेरी रस्ता शुरु...

वणीतील बातम्या