वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
अकोला (प्रतिनिधी): विद्येची खरी देवता,ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,यांचा जन्म,३ जानेवारी १८३१ ला झाला.(नायगाव खंडाळा पेटा,जिल्हा सातारा ).सावित्रीबाई ही खंडोजी नेवसे पाटील यांची मुलगी,सावित्रीबाई बालपणापासून फार हुशार असून. त्यांचे लग्न,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत,१८४० साली झाले. त्यांचे लग्न झाल्यावर महात्मा फुले यांनी, त्यांना लिहायला वाचायला शिकविले.मुला मुलीच्या शिक्षणासाठी, सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी रक्ताच पाणी करून,सर्व जाती-धर्माच्या,मुला मुलींना शिक्षण दिले,या देशांमध्ये पहिली शाळा उघडणारे,फक्त आणि फक्त महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हेच आहेत, दुसरा कोणताही देव शिक्षण देण्यासाठी आलं नाही,संपूर्ण आशिया खंडामध्ये शिक्षणाचे पाया रचणारे भारताची पहिली शिक्षिका,विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,यांची पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांना शिकून या भारतामधल्या स्त्रियांना मुक्त केले.
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्यामुळे सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षण शिकवले कदाचित क्रांतिगुरू लहुजी वस्ताद नसते तर महात्मा फुले आणि सावित्री फुले हे शिक्षण शिकवू शकले नसते,आज कोणालाही शिक्षण मिळालं नसतं,कारण की त्या वेळेस. मनुस्मृति प्रमाणे.स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.परंतु महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी ब्राह्मण यांचे माहेरघर पुणे मध्ये भिडे वाडा या ठिकाणी,भारतामध्ये पहिली शाळा खुलली,लहुजी वस्ताद हे सावित्रीबाईच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते.म्हणून त्यांना कोणीही हात लावण्याची हिंमत करत नव्हते, सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे.३ जानेवारी १८३१,रोजी त्यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतिने अभिवादन करण्यात आले यावेळी परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे, महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश भाऊ तेलगोटे, समाज क्रांती आघाडी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडु दादा वानखडे, परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे अजय तेलगोटे , नितेश तेलगोटे, हर्षल तेलगोटे, उमेश नेते, मयुर सरदार, कुलदिप डोंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...