खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : वणी येथील तहसील कार्यालयात संजय गांधी विभागाकडून एका निराधार विधवा महिलेचा निराधार जमा करण्यासाठी मानसिक त्रास देत असल्याने महिलेला चांगलीच ससेहोलपट होत असल्याने पीडित महिलेने तहसीलदार यांचे कडे एक निवेदन देऊन न्याय मागितला आहे.
तालुक्यातील ब्राह्मणी येथील विधवा महिला छाया जैराम बोधे वय ६० वर्ष या महिलेला सुरळीत निराधार मिळणे सुरू होता परंतु मागील काही महिन्यांपासून तिला निराधार अनुदान वेतन मिळणे अचानक बंद झाले तेव्हा दिपावलीच्या एक- दीड महिन्यांपूर्वी संबंधित कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत निराधार अनुदान का मिळत नाही याची विचारणा केली असता त्यांनी सांगितले की तुम्ही गावाला राहत नाही असे तलाठी यांनी सांगितले म्हणून तुमचा निराधार बंद पडला आहे. तेव्हा त्या महिलेने एक पत्र दिले व सांगितले की मी माझ्याच गावाला राहतो तरी निराधार सुरू करण्याची विनंती. तेव्हा निराधार सुरू होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
परंतु आज पावतो निराधाराचे अनुदान जमा न झाल्याने आज ता. २३ नोव्हेंबर रोजी सदर महिलेने संबंधित कार्यालयात जाऊन विचारणा केली असता तुला मुलगा आहे म्हणून निराधार बंद आहे असे संगण्यात आले. त्यावेळी महिलेने लेखी पुरावा मागितला असता त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही उलट तालाठ्या कडून लिहून घेऊन या म्हणून सदर महिलेला हुसकावून लावले. त्रस्त झालेल्या महिलेने शेवटी तहसीलदार यांना एक निवेदन देऊन होणाऱ्या त्रासाची माहिती दिली व जणीवपूर्वक त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर व कर्मचाऱ्यांवर सक्त कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. सदर महिलेला कोणतेही मुलबाळ नसून ती एकटीच आहे. पंरतु विनाकारण त्रास दिल्या जात असल्याने यावर तहसीलदार काय कार्यवाही करतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...