Home / यवतमाळ-जिल्हा / वणी / सरपंच्यांनी जात,धर्म,पक्ष,आणि...

यवतमाळ-जिल्हा    |    वणी

सरपंच्यांनी जात,धर्म,पक्ष,आणि पंत सोडून गावासाठी एकत्रित यावं - सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर

सरपंच्यांनी जात,धर्म,पक्ष,आणि पंत सोडून गावासाठी एकत्रित यावं - सामाजिक कार्यकर्ते दिलीप भोयर

ट्रीटलाईट थकबाकी ही सरपंच्या समोर नवीन समस्याच

भारतीय वार्ता(वणी): राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे ट्रीटलाईटचे वीजबिल थकीत आहे. काही ग्रामपंचायतीचे तर जवळपास मागील ३०ते ३५ वर्षांपासून वीज बिल थकीत आहे. तर एका एका ग्राम पंचायतीचे करोडो रुपये बिले आहे. यात ग्राम पंचायतीची सर्व संपत्ती जरी विकली तरी बिलाची रक्कम परत फेड होणार नाही अशी बिकड परिस्थिती ग्राम पंचायतीवर आहे.  सर्व कर सरकार ग्राहकांकडून वसूल करीत असले तरी सरकार मात्र याचा भुर्दंड ग्राम पंचायतीवर लादत आहे. मागील ३०ते ३५ वर्षा पासून या ट्रीट लाईट चे बिल अद्याप पर्यंत बहुतांश ग्राम पंचायतीला मिळाले नाही परंतु अचानक या कोरोना काळात महावितरणला या बिलाची आठवण आली आणि अनेक ग्राम पंचायतीला १० करोड पेक्षा जास्त बिल पहिल्यांदाच सुपूर्त केले आहे तर अनेक ग्रामपंचायतींना लाखो रुपयाचे बिल सुपूर्द केले आहे.

जेव्हा की वीज कंपनी व सरकार प्रत्येक गावाकऱ्यांकडून प्रत्येक ग्राहकांकडून ज्या प्रमाणात वीज वापर करते ते बिल तर देत असतात पण त्याच बरोबर स्थिर आकार,  वहन कर, वीज शुल्क असे अतिरिक्त कर हजारो कोटी रुपये वसून करत असतात मग सर्व गावाला ट्रीटलाइट ही मोफत असायला पाहिजे. किव्हा त्याचा भरणा ऊर्जा मंत्रालय अथवा ग्राम विकास मंत्रालयाने भरणा केला पाहिजे. 

ज्या खेड्या पाड्यातील, तांडा वस्तीतील ग्राम पंचायतीचे उत्पन्न कमी आहे, अश्या ग्राम पंचायतीने करोडो रुपये आणायचे कुठून हा मोठा प्रश्न नवनिर्वाचित सरपंच्यांसमोर पडला आहे. त्यामुळे या महत्वाच्या विषयावर आज वणी तालुका ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या वतीने बैठक घेण्यात आली व पुढील काढतात या आव्हानाला कसे सामोरे जायचं याचे नियोजन केले.

येणारा काळ हा निश्चितच आव्हानात्मक आहे. आज ट्रीटलाईट कापली तर सर्व गाव अंधारात जातील. आणि उध्या पाणी पुरवढा जर टार्गेट केला तर गावाच्या गावे पाण्यापासून वंचित होतील. रस्ते, पाणी, शिक्षण हे जनतेच्या टॅक्स वरून जनतेला मोफत द्यावे लागते परंतु सरकार संविधान विरोधी भूमिका घेऊन जर चालत असेल सर्व सरपंच व सर्व सदस्यांनी जात,धर्म,पंत, पक्ष बाजूला सारून गावासाठी गावाच्या सर्वांगिन विकासासाठी एकजुटीने कार्य केले पाहिजे. हीच सदिच्छा  धन्यवाद यावेळी ग्रामसंवाद सरपंच संघाचे  तालुकाध्यक्ष अजय कौराशे, तालुका सचिव हेमंत गौरकर, लालगुडा ग्राम पंचायतीचे सरपंच चालकुरेजी तसेच मारेगाव तालुकअध्यक्ष देखील विचारपीठावर उपस्थित होते असून तालुक्यातील विविध गावाचे सरपंच उपसरपंच सदस्य उपस्थित होते.

ताज्या बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते,   आमदार संजय देरकर. 05 February, 2025

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* 05 February, 2025

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*

*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* 05 February, 2025

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला*

*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* 05 February, 2025

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला*

*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...

श्री  रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप. 05 February, 2025

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार. 05 February, 2025

वरोरा रोडवरील संविधान चौकात भिषण अपघातात तरूण ठार.

वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...

वणीतील बातम्या

खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.

वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.

: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...

प्रकल्पग्रस्तांना ना योग्य मोबदला, ना अद्याप पुनर्वसन उकणी येथील शेतकरी आक्रमक, सोमवारपासून वेकोलि कार्यालयासमोर उपोषण

वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...