आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
प्रविण गायकवाड (राळेगाव प्रतिनिधी): सरपंच होणे महा भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य तुम्हाला लाभले. गावाच्या विकासासाठी झटताना आई होऊन कार्य करा असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसेवक व पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांनी व्यक्त केले. ते खडकी येथे ग्रामपंचायत द्वारा आयोजित भूमिपूजन व सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार डॉ प्रा अशोकरावजी उईके, यशदाचे प्रशिक्षक देविदासजी ढगे,स्वागताध्यक्ष रमेशजी पाटील झोटिंग, जी प सदस्या प्रीतीताई काकडे, विवेकभाऊ दौलतकर, वनश्री पुरस्कुत स्नेहल नर्सरी हिगणघाट चे संचालक दिंगाबरजी खांडरे,सरपंच संघटनेचे नेते कीशोर धांमदे, सरपंच करंजी प्रसादभाऊ ठाकरे , पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष आशिषजी भोयर, यांची उपस्थिती होती.
खडकी येथील गुणवंत विद्यार्थी, नागरिक यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला. पेरे पाटील यांच्या हस्ते परिसरातील नवनिर्वाचित सरपंच यांचा शाल व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. देविदास ढगे यांनी सरपंच आणि योजना या विषयावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणातून प्रा उईके यांनी गाव विकासाच्या दृष्टीने आपण सर्वोतोपरी मदत करु असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच राजेंद्रजी झोटींग, तर संचालन प्रा.अभिजीतजी डाखोरे यांनी केले, यावेळी ,आमदार ऊईके यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव राजेश ढगे, सरपंच रंजना नाहाते, ग्रा प सदस्य, जयश्री तामगाडगे, पुंडलिक झोटींग, किसनराव ऊईके, पार्वताबाई आत्राम, सोमीत्रा भोयर, विठ्ठल खोडें, गजानन कोल्हे,सांरग वाभीटकर, रविंद्र जवादे,भारत खैरे निलेश नाहाते,राहूल जिवने, सिध्दार्थ पाटील, भास्कर पाटील,जागेश्र्वर चतूरकर, प्रविण खेवले, तसेच पर्यावरण संवर्धन संस्था खडकी च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...
:- वणी आज दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी वणी वरोरा मार्गावरील रेल्वे गेटच्या बाजूला अनोळखी इसमाने गळफास घेतलेल्या...