आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
पुणे (भारतीय वार्ता ): संतोष शिंदे यांनी महाविद्यालयात विद्यार्थी दशेपासून संभाजी ब्रिगेड मध्ये गेली सतरा-अठरा वर्षापासून काम करत आहेत. पुण्यातील प्रत्येक चौकामध्ये आंदोलन केली असल्याचा इतिहास आहे. जेम्स लेन तथा भांडारकर आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. तसेच रायगडवर मेघडंबरी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलने, दादोजी कोंडदेव पुतळा हटवला, एसटी कामगारांसाठी आंदोलन, पुणे महानगरपालिके समोर वेगवेगळी अंदोलने, गडकरी पुतळा प्रकरण, डीएड विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन, पाठ्यपुस्तकातील चुकीचा व खोटा इतिहास गळणे यासाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. 'नोटबंदी' विरोधात देशातील केंद्र सरकार विरोधातील पहिले आंदोलन पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवाजीनगर येथे करण्यात आले. इतिहासातील संस्कृतीत दहशतवाद, सर्वसामान्य तरुणांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न याबाबत संतोष शिंदे यांनी सातत्याने आवाज उठवला. पुण्यामध्ये पुणे शहर सरचिटणीस, जिल्हा कार्याध्यक्ष व 'पुणे जिल्हाध्यक्ष' या पदावर सक्षमपणे संघर्षात्मक नेतृत्व सिद्ध केले. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी व सर्व बहुजन समाजासाठी हक्काचा आवाज म्हणून संतोष शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.त्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य संघटनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते ह्या पदाचा पद भार सांभाळताना
माझे काम हे सर्व समान वागणूक देऊन संभाजी राज्य प्रमाणे न्याय देण्याची गवाई देताना खालील प्रमाणे प्रतिक्रिया दिल्या.
'संभाजी ब्रिगेड'चे महाराष्ट्र स्तरावर सर्वांना सोबत घेऊन शिस्तबद्ध पध्दतीने उत्तम रित्या काम करेल. लोकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करत राहील. शेतकरी, कष्टकरी, भटके-विमुक्त, दलित, पीडित, शोषित व संपूर्ण बहुजनांच्या न्याय हक्कासाठी व सर्व समाजाच्या हितासाठी दिवस-रात्र काम करण्याचा प्रयत्न करेल. समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा मोलाचा सहभाग असेल. दिवस-रात्र एक करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 'संभाजी ब्रिगेड' पोहोचण्याचा प्रयत्न करेल. संभाजी ब्रिगेडचे मजबूत संघटन व कार्यकर्ता सक्षम करण्याचा माझा प्रयत्न असेल. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि दिलेल्या जबाबदारी'चा मी नक्कीच सोने करण्याचा प्रयत्न करेल. प्रामाणिकपणे व कुठलाही राग, द्वेष, मत्सर मनात न ठेवता सर्वांना सोबत घेऊन काम करेल. संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभदादा खेडेकर यांचे हात मजबूत करण्यासाठी व महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कॅडर बेस कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी प्रयत्न असेल.
मी, मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार माझा श्वास आहे. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि संघर्षातून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. तुमची साथ असू द्या. मी तुम्हाला दाद देतो .
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...