वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
हल्ल्याप्रकरणी सखोल चौकशी करून पडद्यामागील व प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आरोपींचा तपास करून गुन्हे दाखल करण्याची मागणी !
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी) : साप्ताहिक चंद्रपूर क्रांती तथा न्यूज पोर्टल चे संपादक संजय कन्नावार यांनी आपल्या न्यूज पोर्टल वर एका बार अँड रेस्टॉरंट मधे पत्रकारांनी दुसऱ्याच्या चिकन फ्रॉय चोरल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. ती बातमी अनेक न्यूज पोर्टल वर सुद्धा प्रकाशित करण्यात आली. दरम्यान या बातमी मध्ये कुणाही पत्रकारांची नावे प्रकाशित केली नव्हती. पण एका मोठया दैनिक पेपर चे जिल्हा प्रतिनिधी व लोकल टीवी चायनल चे प्रतिनिधी हे पोलीस स्टेशन मध्ये जावून आमची काही पोर्टल मध्ये बातमी प्रकाशित करून बदनामी करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती व सोबतच खासदार, आमदार यांच्याकडे सुद्धा तक्रार देण्यात आली. पण त्या पत्रकारांनी लेखी तक्रार दिली नाही कारण ज्यावेळी ते पत्रकार दुपारच्या वेळी बार मध्ये दारू पीत होते त्यावेळी ते आपल्या कर्तव्यावर होते त्यामुळे ते लेखी तक्रार देऊ शकले नाही.
कॉल रेकाॅर्डींग व शेजारच्या सिसीटिव्ही ची तपासणी केल्यास कोण-कोण आहेत सामिल याचा पोलिसांना मिळेल पूरावा !
पत्रकाराने पत्रकाराबाबत केलेल्या बातम्या या काही नवीन नाही पण दुर्गापूर परिसरातील इमली बार जवळ शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी संजय कन्नावार यांना फोन करून "आपण कुठे आहात? मला आपल्याला भेटायचे आहे. त्यात चिकन चोर संबंधात काही पुरावे आहे का मी आत्ताच आपल्याला भेटतो."असा सात साडेसातच्या दरम्यान फोन केला. संजय कन्नावार यांनी मी आता इमली बार जवळ आहे पण आत्ता मला भेटू नका. असे सांगितले त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काही गुंड प्रवृत्तीचे लोक इमली बारमध्ये व त्याच्या शेजारील परिसरातून येऊन संजय कन्नावार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. भितीने संजय कन्नावार हे बारमध्ये शिरले. त्यांनी आपल्या मित्रांना फोन करून या घटनेची माहिती दिली. सगळ्यात महत्वाचे म्हणजे संजय कन्नावारची ओळख गुंडांना करून देण्यासाठी पवन झब्बाडे स्वता गुंड प्रवृत्तीच्या लोकांसोबत त्या ठिकाणी उपस्थित होता, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे, आता याचा तपास पोलिसांनी करायला हवा कारण हा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे.
"त्या" दोन पत्रकारांची चौकशी करण्यात यावी !
पत्रकारांनी लेखणीच चालवायला हवी तलवारी पेक्षा मोठे काम लेखणी करू शकते, असे म्हटले जात होते परंतु आता पत्रकार लेखणी सोडून तलवार आणि गुंडांच्या साथ घेत असेल तर ज्येष्ठ पत्रकारांनी याच्या विचार करून अशां पत्रकारांच्या पेटकाडात लाथा द्यायला हव्या. पत्रकारांवर गैर प्रवृत्तीच्या लोकांकडून हमला होणे ही बाब नित्याचीच आहे परंतु पत्रकारांनी एखाद्याला सुपारी देऊ पत्रकारावर हमला करणे ही बाब अत्यंत शोचनीय व पत्रकारितेला काळिमा फासणारी आहे याचा जुन्याजाणत्या पत्रकारांनी अवश्य विचार करायला हवा. मारहाण करण्यासाठी बाहेरच्या गुंडा कडून एका संपादकांवर प्राणघातक हल्ला केला हे लोकशाहीला घातक असून खुलेआम फोन करून हल्ला करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी बाब आहे कारण पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाही वर हल्ला आहे आणि म्हणून संजय कन्नावार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर पत्रकार संरक्षण अधिनियम अंतर्गत व इतर कलमांवये गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा डिजिटल पोर्टल असोसिएशन व संपूर्ण पत्रकार संघटना पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतील असा इशारा पत्रकार परिषदेतून देण्यात आला.
यासंदर्भात आज पोलिस अधिक्षक व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्र्यांनी पत्रकारांना यासंदर्भात चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...