आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
कोळसा खदानीचा फायदा घेऊन रेती तस्करी जोरात
घुग्गुस : नकोडा येथून जवळच्या वर्धा नदी च्या चिंचोली घाटावर रेती तस्करांनी हजाराे ब्रास रेती साठा साठवुन ठेवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वर्धा नदीतून रोज हजारो ब्रास रेती चोरी करून त्या रेतीला साठवुन मध्य रात्री हायवा गाडीने अन्य जिल्ह्यात 35 ते 40 हजार रुपये प्रति हायवा किमतीच्या दरात रेती विकल्या जात असुन रेती तस्कर रेती विकुन मालामाल हाेतांना दिसतात .त्यानी वाणीकडे मोर्च्या वडवला आहे. मात्र घुग्घुस येथील पटवारी दिलीप पिल्लई तसेच मंडल अधिकारी किशाेर नवले मुख्य ठीकानी उपस्थीत असूनही या कडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहेत.
हजारो ब्रास रेती माफियानी जमा करून नदीपात्रात ठेवली आहे, अधिका-यांचा संगनमताने च रेती चोरी सुरू आहे असे संपूर्ण परिसरात बाेलल्या जात आहे. या सर्व प्रकारामुळे कोट्यावधी रुपयांच्या शासनाचा महसूल बुडत असल्यांने शासनाला आर्थिक नुकसानाला समाेर जावे लागत असुन, एकीकडे मात्र रेती तस्करांची मुजोरी दिवसेन दिवस वाढत आहे. त्या परिसरात फेरफटका मारल्यास पटवारी दिलीप पिल्लई, व मंडल अधिकारी, किशोर नवले, हे रेती तस्करांचा दुचाकी वाहन क्र. एम एच 34 बी एन – 3826 वाहनाने फिरत असतांना आढळले. कसलीही कारवाही न करता आम्ही काही तरी करताे हे दाखवण्या करिता पाेकलेंड मशिन द्वारे रेती तस्करांनी रेतीची चाेरी करू नये म्हणून चोरीच्या मुख्य मार्गावर २० फुट माेठ्या स्वरूपातील खड्डे करण्यात येत आहे. परंतु तस्करांना रोखण्या करिता किती ही उपाय याेजना केल्या तरी अधिकाऱ्यांच्याच आशिर्वादाने रेती तस्कराचे मनाेबल वाढत असुन राेज घाटा वरिल रेती माफिया रेती ची तस्करी करत असल्याचे शहरात दबक्या आवाजात चर्चेला उत आला आहे. असे असुन सुद्धा प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत दिसुन येत आहे . या सर्व बाबीची सखाेल चाेैकशी करून तात्काळ दाेषी अघिकारी व रेती तस्करांवर कारवाही व्हावी अशी जी मागणी होत आहे ती फोल ठरत आहे. तर रेती लिलाव नसताना कोटी रुपयाची कामे केली जात आहे, महसूल चोरी लक्षात घेता पायाभूत कर्मचारी याना कर्तव्यातून हदपार करणे गरजेचे झाले आहे. हे यावरून समोर येत आहे. हे सत्य नसेल तर फिर्याद का नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...