वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)
झरी: झरी तालुक्यातील मुकुटबन हा परिसर औद्योगिक वसाहत म्हणून नावारूपास आला आहे. अडेगाव येथे डोलोमाईट, गणेशपूर येथे चुना कंपन्या, मुकुटबन येथे कोल माईन्स, बिरला सिमेंट प्रोजेक्ट, पांढरकवडा (लहान) येथील इस्पात कंपनी अशी अनेक छोटी मोठी उद्योग धंदे या परिसरात आहे. शेती जाऊन त्या जागी झालेल्या कंपन्या मुळे येथे बेरोजगार संख्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे तसेच परराज्यातून अनेक कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेे आहेत. अशा सर्व असंघटित कामगारांना इ-श्रमिक कार्ड मिळणे आवश्यक आहे त्यामुळे या शिबिरास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुटबन येथे रोज रविवार व सोमवार दिनांक 26 ते 27 डिसेंबर 2021 दरम्यान शिबीर होणार आहेत. सदर शिबिर झरी तालुक्यातील
सरपंच यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
या शिबिरात बांधकाम कामगार, रस्त्यावरील विक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, ऑटो चालक, वृत्तपत्रे विक्रेते, पशुपालन कामगार, शिलाई मशीन कामगार, सुतार काम करणारी व्यक्ती, आशा व अंगणवाडी सेविका, मिठ कामगार, न्हावी कामगार, पिठ गिरणी, ब्युटी पार्लर, पेंटर, इलेक्टरेशीयन, प्लंबर या सर्व कामगारांना आपली नोंद या शिबिरात करता येणार आहे.
कार्डधारकांना वित्तीय सहायता, मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत, मातृत्व लाभ, घर बांधणी आर्थिक सहाय्य अशी काही सरकारी मदत घेता येणार आहे. यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल न. आवश्यक आहे.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी देव येवले तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, अनिलभाऊ कडू, शंकर झाडे (पंचायत समिती सर्कल प्रमुख अडेगाव कोसारा), समीर लेनगुडे (झरी पंचायत समिती सर्कल प्रमुख), सचिन टोंगे, प्रशांत बोबडे, संदिप आसुटकार, सुरज सुरपाम वेदड, अनिकेत टोंगे भेंडाला, कामतकर खातेरा, किशोर क्षीरसागर डोंगरगाव, छंदक तेलंग मांगली, फैजल शेख मुकुटबंन, गीतेश बेलेकर गणेशपूर, विवेक गोडे कोसारा, आशिष झाडे दृष्यांत काटकर, विजय भेदूरकार वैभव मोहितकर मार्कि, प्रणय काळे वेदड आदींचे सहकार्य मिळणार आहे. झरी तालुक्यातील जास्तीत जास्त कामगारांनी इ श्रमिक कार्ड साठी नोंदणी करावी असे आवाहन नितेश ठाकरे यांनी केले आहे.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
झरी :तालुक्यातील मुकुटबन येथील विठ्ठल दासरवार या शेतकऱ्याच्या सम्पूर्ण शेताची रान डुकराने नासाडी करून उभे कापसाचे...
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, असा साजरा...