Home / महाराष्ट्र / संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील...

महाराष्ट्र

संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील सर्व 'ग्रामपंचायत निवडणुका लढवणार

संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील सर्व 'ग्रामपंचायत निवडणुका लढवणार

ग्रामीण भागात संभाजी ब्रिगेड ची ताकद मजबूत आहे.

 

वणी:   परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून पुरोगामी विचारधारा सांगत गावगाड्यातील प्रत्येक कार्यकर्ता संभाजी ब्रिगेडने बांधला आहे. वेगवेगळ्या पक्षीय राजकारणामुळे मोठ्या निवडणूकीत कार्यकर्ते विभागले जातात, मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत असं होत नाही. गावचा विकास, सामान्य लोकांचे प्रश्न, रस्ते, वीज, शिक्षण (शाळा) अन्नधान्य वितरण व इतर गोष्टीला सोबत घेउन गावचा विकास करणारा असेल आणि जो विकासाभिमुख राजकारण करू शकतो त्याच्या हातात सूत्र दिली जातात. संभाजी ब्रिगेड नेहमी तरुणांसाठी राजकारण करत आलेली आहे. १००% समाजकारण आणि १००% राजकारण हे ब्रिद घेऊन 'समृद्ध महाराष्ट्र' घडवण्यासाठी भविष्यातील राजकारणामध्ये संभाजी ब्रिगेडचा फार मोठा वाटा असेल. मागच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड'ने 385 जागांवर यश यश मिळवले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी एक हाती संभाजी ब्रिगेडची सत्ता आहे, त्याठिकाणी संभाजी ब्रिगेडने चांगल्या पद्धतीने गावचा विकास करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठ्या निवडणुका अर्थात लोकसभा-विधानसभा यामध्ये आम्ही नवखे असल्यामुळे आम्हाला समाधानकारक यश मिळवता आलेलं नाही. गाव गाड्याचा अभ्यास संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्याला चांगला माहिती आहे. त्यामुळे अजून जोमाने काम करून महाराष्ट्राच्या भविष्यासाठी व गावाच्या विकासासाठी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रातील सर्व 14,234 ग्रामपंचायत निवडणुका लढवणार आहे... अशी 'घोषणा' पुण्यातील (13 डिसेंबर) चिंतन बैठकीत संभाजी ब्रिगेड' चे प्रदेशाध्यक्ष मा. ॲड. मनोज आखरे साहेब यांनी जाहीर केले आहे.

आम्ही राजकारणात नवीन आहोत मात्र 'अज्ञानी' नाहीत. चांद्यापासून बांधापर्यंत संभाजी ब्रिगेड चांगल्या पद्धतीने पोहोचलेली आहे. आज पर्यंत आम्ही समाजकारण करत असल्यामुळे आमच्या समविचारी पक्षांना राजकारणामध्ये पाठबळ देत गेलो. मात्र त्यांनी आम्हाला कधीच गृहीत धरलं नाही. कारण आम्ही फक्त कॕडर अर्थात प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करत गेलो आणि दुसऱ्या पक्षांना पुरवत गेलो असल्यामुळे आमचं नेहमी नुकसान झालेला आहे. आमची मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग याठिकाणी कार्यकर्त्यांचे जाळे आणि संभाजी ब्रिगेडची ताकत जबरदस्त आहे. संघटनात्मक बांधणी चांगली आहे. त्यामुळे आम्हाला यश चांगल्या पद्धतीने मिळेल. मात्र यापुढे चांद्यापासून बांद्यापर्यंत..., गल्लीपासून दिल्लीपर्यंत... संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता १००%  समाजकारण करणार आणि १००%  टक्के राजकारण करणार असल्यामुळे आम्ही लोकांना आमचा स्वतंत्र पर्याय देणार आहोत. पॅनल पद्धत असो किंवा थेट सरपंच आम्ही प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून १००% यश मिळवण्याचे काम 2021 च्या निवडणुकीत करणार आहोत. 2021 हे वर्ष संभाजी ब्रिगेड साठी सुवर्णकाळ असेल असे मत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मा. संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

ग्रामपंचायत निवडणुका संघटनात्मक बांधणी ताकतीची करून जोरदार लढवण्याचे आदेश संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. मनोज आखरे साहेब व महासचिव मा. सौरभ खेडेकर साहेब यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हाध्यक्षांना दिलेले आहेत. गाव, तालुका व जिल्हा पातळीपर्यंत प्रत्येकांनी झाडून कामाला लागण्याचे आश्वासन दिले आहे. 'माझं गाव, माझी ब्रिगेड आणि माझी जबाबदारी...! हे तत्व उराशी बाळगून संभाजी ब्रिगेडचा गावपातळीपर्यंत चा प्रत्येक कार्यकर्ता ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामाला लागला आहे.

संभाजी ब्रिगेड शेतकरी, कष्टकरी, कामगार, भटके-विमुक्त, बहुजन, दिन-दलित व सर्व समाजासाठी आजपर्यंत काम करत आलेली आहे. संभाजी ब्रिगेडचा संघर्ष हा 'फक्त लोकांसाठी' असतो, हे प्रत्येक माणसाच्या मनावर आजपर्यंत बिंबवले गेलं आहे. हक्काचा आवाज म्हणून संभाजी ब्रिगेड कडे पाहिलं जातं. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतून संभाजी ब्रिगेडला मोठ्या अशा आणि अपेक्षा आहेत. अजून चांगल्या पद्धतीने संघटनात्मक बांधणी करणार आहोत आणि तरुणांना जास्तीत जास्त संधी मिळवून देणार आहोत. म्हणून आम्ही राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहोत.

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...