Home / महाराष्ट्र / प्रस्तापित घराणेशाही...

महाराष्ट्र

प्रस्तापित घराणेशाही ची व्यवस्था बदलण्यासाठी 'संभाजी ब्रिगेड' चा राजकीय जन्म - प्रा. गंगाधर बनबरे

प्रस्तापित घराणेशाही ची व्यवस्था बदलण्यासाठी  'संभाजी ब्रिगेड' चा राजकीय जन्म - प्रा. गंगाधर बनबरे

संभाजी ब्रिगेड वर्धापन दिन पुण्यात साजरा

'संभाजी ब्रिगेड' ने २५ वर्ष समाजकारण केले.  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गावागावात जाऊन घराघरापर्यंत प्रबोधनाचा महासागर निर्माण केला. शिवराय- फुले- शाहू- आंबेडकरांचे विचारधारा व खेडेकर साहेबांचा समृद्ध दृष्टिकोन लोकांच्या मनामध्ये रुजवला. महाराष्ट्राला सामाजिक व राजकीय दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी व प्रस्थापित घरानेशाही व्यवस्था बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेडने राजकारणात प्रवेश केला. ग्रामपंचायतीपासून विधिमंडळाला पर्यंत राजकीय 'स्पेस' निर्माण करण्यासाठी संभाजी ब्रिगेडची घोडदौड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू आहे. म्हणून सर्वांनी संघटितपणे काम करून संभाजी ब्रिगेड अजून जोमाने वाढवावी असे मत संभाजी ब्रिगेडचे मुख्य प्रवक्ते मा. गंगाधर बनबरे व्यक्त केले.

संभाजी ब्रिगेड पदवीधर मतदारसंघातील उमेदवार इंजि. मनोजकुमार गायकवाड यांचा प्रचार अंतिम टप्प्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे म्हणाले... प्रस्थापित घराणेशाही आम्हाला उध्वस्त करायचे आहे. संभाजी ब्रिगेड लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी या राजकीय व्यवस्थेमध्ये उतरले आहे. रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणार आहोत. संभाजी ब्रिगेड तरुणांचं संघटन आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व तरुणांनी करावे... यासाठी संभाजी ब्रिगेडचा संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक समाज बांधवांना समृद्धीच्या वाटेवर घेऊन विकासाचा चेहरा संभाजी ब्रिगेडच्या रुपाने महाराष्ट्राला दाखवायचा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे... असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी व्यक्त केले.

संभाजी ब्रिगेड नवीन नियुक्त्या...

१) मा. संतोष शिंदे - प्रदेश संघटक
२) डॉ. योगेश पाटील - ठाणे विभागीय अध्यक्ष
३) मा. सूर्यकांत भोसले - कोकण विभागीय अध्यक्ष
४) मा. प्रशांत धुमाळ - पुणे जिल्हा कार्याध्यक्ष

वरील वरील सर्वांच्या नियुक्त्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांनी नियुक्तीपत्र देऊन केले.

'संभाजी ब्रिगेड' च्या वर्धापन दिना निमित्त संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने 'डेक्कन' येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून... जय जिजाऊ... जय शिवराय...!! तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय...!!! रक्ता रक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय...!! आदी घोषणा देऊन सर्व महापुरुष यांना अभिवादन करण्यात आले. Covide-19 परिस्थिती पाहता या वर्षी चा 'वर्धापन दिन' रद्द करून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

'छत्रपती संभाजी महाराज' यांच्या पुतळ्यास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गाडगे, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, ठाणे विभागीय अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, सूर्यकांत भोसले, निलेश काळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महिला जिल्हाध्यक्ष मोहिनी रणदिवे, गणेश चऱ्हाटे, संदीप लहाने पाटील, निलेश काळे, विवेक कावरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर घाडगे केले तर आभार अविनाश मोहिते व उत्तम कामठे यांनी मानले. वर्धापन दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...

ताज्या बातम्या

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* 27 December, 2024

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी*

*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव. 26 December, 2024

मोरोती देवस्थान शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सव.

वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...